इंदूर- सुप्रसिद्ध शायर यांचे करोनाने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. आज सकाळी त्यांनी स्वतः करोनाची लागण झाल्याने इस्पितळात भरती झाल्याचे ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, 'करोनाची सौम्य लक्षणं दिसल्यानंतर काल करोनाची चाचणी केली. याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी ऑरबिंदो इस्पितळात भरती झालो. मी या आजाराला हरवेन अशी प्रार्थना करा.' यासोबत कोणीही घरच्यांना किंवा त्यांना फोन न करण्याचीही विनंती केली होती. विशेष म्हणजे इंदूर हे करोनाचं हॉटस्पॉट झालं आहे. सुरुवातीला सर्वात जास्त करोनाचे रुग्ण इंदूर येथेच सापडले होते. काही दिवसांनी स्थिती नियंत्रणात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा इंदूर येथे करोना रुग्णांची संख्या वाढली होती. रविवारी इंदूर येथे २०८ करोना रुग्ण सापडले होते. तर सोमवारी ही संख्या १७६ होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kxueZN