मुंबई- कंगना रणौतची ओळख एक उत्कृष्ट अभिनेत्रीसोबतच निर्भीडपणे आपलं मत मांडणारी व्यक्ती म्हणून आहे. प्रत्येक गोष्टीवर आपले मत ठेवते. सिनेउद्योगातील शोषणाबद्दल बोलणं असो किंवा ड्रग्जशी संबंधित एखादी जुनी घटना, ती कोणालाही न घाबरता आपलं म्हणणं स्पष्टपणे जगासमोर मांडते. मात्र कंगनाच्या याच स्वभावामुळे तिच्या आईची चिंता वाढली आहे. कंगनाने स्वतः एका ट्वीटमध्ये याचा उल्लेख करत कंगनाची आई तिच्या लग्नासाठी उपास करत असल्याचं सांगितलं. कंगना तिच्या आईशी फोनवर बोलली कंगनाने ट्वीट करत सांगितलं की, ‘काल रात्री आईला उत्सुकतेने फोन केला आणि मुलाखत कशी वाटली ते विचारलं. पण ती रडायला लागली. म्हणाली मी तुझ्या लग्नासाठी उपवास करतेय आणि तू जगाला तुझ्यासोबत घडलेल्या वाईट घटना सांगत आहेस. आताही फोन येत आहे असं वाटतं, तिचं रडण्याचा नाही तर रडवण्याचा हेतू आहे. काय करू? ’ कंगनाने दिलं नापसंत करणाऱ्या व्यक्तींना प्रत्यूत्तर सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात कंगना सुरुवातीपासूनच आपलं मत मांडत आली आहे. कंगनाने आताही एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादाय खुलासे केले. यामध्ये काहींनी तिच्यावर या सगळ्यात ती ‘वैयक्तिक अजेंडा’ आणत असल्याची टीकाही केली. यावर बोलताना कंगनाने ट्वीट करत स्पष्ट केलं की, ‘ते जे सारे माझे शुभेच्छुक आहेत ज्यांना मी शांतपणे स्वतःवरचा अन्याय सहन करावा असं वाटतं, ज्यांनी सुशांतच्या झालेल्या छळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, ते आता मला सांगत आहेत की हे प्रकरण माझ्याबद्दल नाही. मी त्या सर्वांना एकच सांगू इच्छिते की त्यांनी स्वतःचं तोंड बंद ठेवावं.’ कंगना म्हणाली तीही पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाली असती कंगनाने हे ट्वीट एका यूझरला उत्तर देण्यासाठी लिहिलं होतं. यात ती एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिसत आहे. यात कंगना म्हणाली की, तीही पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाली असती. तसेच करिअरमध्ये अशा सर्व गोष्टींचा सामना केला असतानाही सुशांत प्रकरणात तिने आपली प्रतिक्रिया का देऊ नये असा प्रश्नही कंगनाने यावेळी उपस्थित केला. मणिकर्णिका सिनेमावेळील कॉन्ट्रोव्हर्सीला म्हणाली कट- कारस्थान कंगनाने दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘मणिकर्णिकाशी निगडीत वादही तिला आणि तिच्या करिअरला संपवण्यासाठी करण्यात आला होता. जेव्हा सिनेमाच्या प्रदर्शनाची मी पूर्ण जबाबदारी घेतली तेव्हा मी महाकालला प्रार्थना केली होती.’
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YOlMfx