नवी दिल्लीः ने आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा लेटेस्ट मिड रेंज स्मार्टफोन मोठ्या आस्पेक्ट रेशियाचा डिस्प्ले, दमदार प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि जबरदस्त ड्यूल रियर कॅमेरा सेटअप सोबत येतो. कंपनीने केवळ एकाच व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. एचटीसीने नवीन फोनमध्ये कोणते फीचर्स दिले आहेत, जाणून घ्या. वाचाः चे वैशिष्ट्ये फोनमध्ये 720x1560 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.२ इंचाचा IPS LCD एचडी+ डिस्प्ले दिला आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजसोबत येणाऱ्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो P22 चिपसेट दिला आहे. फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. अँड्रॉयड १० ओएस वर काम करणाऱ्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्यूल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात एलईडी फ्लॅश सोबत १६ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनच्या कॅमेऱ्याने 1080 पिक्सल रेजॉलूशनचा व्हिडिओ शूट केला जावू शकतो. वाचाः फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh ची बॅटरी दिली आहे. एकावेळी चार्ज झाल्यानंतर बॅटरी २० तासांपर्यंत टॉकटाईम, २५ तासांपर्यंत प्लेबॅक आणि ६ तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. बायोमॅट्रिक सिक्योरिटीसाठी फोनमध्ये रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. वाचाः किंमत कंपनीने या फोनला सध्या रशियात लाँच केले आहे. रशियात या फोनची किंमत १३५ डॉलर म्हणजेच १० हजार १२४ रुपये आहे. ब्लॅक आणि ब्लू या दोन रंगात फोन उपलब्ध करण्यात आला आहे. रशियानंतर अन्य देशात हा फोन कधीपर्यंत लाँच करण्यात येणार आहे, यासंबंधी कंपनीने अद्याप कोणतीही माहिती जाहीर केली नाही. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gHJkcW