Full Width(True/False)

सॅमसंग गॅलेक्सी A21s झाला स्वस्त, पाहा नवी किंमत

नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने आपला गॅलेक्सी A21s स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनच्या किंमतीत ५०० रुपयांची कपात केली आहे. नवीन किंमत ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर सुद्धा अपडेट करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनच्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात केली होती. त्यावेळी ४ जीबी रॅमच्या किंमतीत कपात करण्यात आली नव्हती. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा आणि 5000mAh मोठी बॅटरी यासारखे फीचर्स आहेत. वाचाः Samsung Galaxy A21sची नवीन किंमत किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर सॅमसंग गॅलेक्सी ए२१एस स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजची किंमत आता १५ हजार ९९९ रुपये झाली आहे. याआधी या फोनची किंमत १६ हजार ४९९ रुपये झाली आहे. फोनच्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १७ हजार ४९९ रुपये आहे. स्मार्टफोन तीन कलर ऑप्शन ब्लू, ब्लॅक, व्हाइट मध्ये येतो. वाचाः फोनचे खास वैशिष्ट्ये या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा HD+ डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720x1600 पिक्सल मिळतो. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६ जीबी रॅम सोबत ६४ जीबी स्टोरेज मिळतो. तसेच सॅमसंगचा ऑक्टाकोर Exynos 850 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनचा स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. वाचाः फोटोग्राफीसाठी यात ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियर कॅमेऱ्यात ८ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी यात १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिलीआहे. तसेच 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2CkUJ3c