Full Width(True/False)

समोर आले रिया चक्रवर्तीचे आयटीआर, एफडीचे डिटेल्स

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी त्याची कथिच प्रेयसी रिया चक्रवर्तीची चौकशी करत आहे. आज दुसऱ्यांदा तिला चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी आणि त्यानंतर आज सोमवारी रिया, तिचा भाऊ शौविक, वडील इंद्रजीत आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदीला चौकशीसाठी बोलावले. सध्या रियाच्या प्रत्येक व्यवहारांवर ईडीची बारीक नजर आहे. दरम्यान एका इंग्रजी वेबसाइटला रियाच्या आयकर परताव्याचा (इनकम टॅक्स रिटर्न) तपशील मिळाला आहे. यातून अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. - रिया चक्रवर्तीच्या २०१७-१८, १८-१९ या आर्थिक वर्षाच्या कमाईत अचानक वाढ झाली. पण ही वाढ कोणत्या मार्गाने झाली हे कळले नाही. -आता ईडी याच उत्पन्नाची तपासणी करत आहे. नक्की ही वाढ कशी झाली हे पडताळून पाहत आहे. याशिवाय रियाने बर्‍याच ठिकाणी गुंतवणूक केली आहे. तिच्या मिळकतीपेक्षा तिची गुंतवणूक जास्त दिसत आहे. - २०१७-१८ या आर्थिक वर्षात रियाची कमाई जवळपास १८ लाख होती. (हे कर कपातीहून वेगळे आहे.) - २०१८-१९ या आर्थिक वर्षात रियाने आयटीआरमध्ये १८ लाख रुपयांये उत्पन्न दाखवले आहे. - २०१८ पासून१९ पर्यंतच्या काळात रियाची स्थावर मालमत्ता ९६ हजारांहून ९ लाखांवर गेली होती. - एवढेच नव्हे तर रियाची काही कंपन्यांमध्येही भागीदारी होती. ईडी याचाही तपास करत आहेत. २०१७-१८ मध्ये वार्षिक उत्पन्न १८ लाख असताना ३४ लाखांचे शेअर रियाने कसे विकत घेतले याचा तपास ईडी करणार आहे. - रियाचा शेअर होल्डर फंड २०१७-१८ मध्ये ३४ लाखांवरून २०१८-१९ मध्ये ४२ लाखांवर पोहोचला. - याशिवाय एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकमध्ये असलेल्या एफडीचीही तपासणी केली जात आहे. - आयटीआर तपासणीमध्ये २०१७ ते २०१९ दरम्यान कोणत्याही मोठ्या व्यवहाराची माहिती नाही. दरम्यान, सुशांतसिंग राजपूतच्या कुटुंबियांनी सुशांतच्या बँक खात्यातून वर्षभरात १५ कोटी रुपये काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या पैशांव्यतिरिक्तही अनेक आरोप रियावर करण्यात आले. याचमुळे ईडीने या प्रकरणात हस्तक्षेप करत चौकशी करण्याचा निर्णय घेतला. ईडीने सुशांतच्या बँक अकाउंटच्या चौकशीत शुक्रवारी रियाची आठ तासांहून अधिक तास चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत रियाने अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने उत्तरं न दिल्यामुळे तिला आज पुन्हा एकदा चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. आपण सुशांतचे कोणतेही पैसे घेतले नसल्याचं रियाने यावेळी स्पष्ट केलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2DQ3frz