मुंबई: लग्नानंतर संसारात रमलेली अभिनेत्री मनोरंजनविश्वापासून काहीशी लांब होती. त्यानंतर तिनं छोट्या पडद्यावर पुनरागमन करत. गप्पा-गोष्टी आणि संगीताचा समावेश असलेल्या अनोख्या 'मैफिल' या टीव्ही रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन केलं. लॉकाऊनमध्ये क्रांती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह झाली आहे. रेसिपींचे व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ती मेजवानी देतेय तर तिनं शेअर केलेले भन्नाट व्हिडिओ देखील चर्चेचा विषय ठरतात. क्रांती मार्च २०१७ मध्ये आयपीएस अधिकारी समीर वानखेडे सोबत लग्नबंधनात अडकली होती. त्यानंतर २०१८मध्ये ३ डिसेंबर रोजी तिनं दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी क्रांती तिच्या मुलींचे फोटो केव्हा शेअर करणार किंवा का शेअर करत नाही, असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडतात. ही क्रांतीच्या जुळ्या मुलींची नावं आहेत. या दोघींच्या नावावरून तिनं कपड्याचा ब्रॅंड देखील लॉन्च केला आहे. क्रांती अनेक व्हिडिओ, फोटो शेअर करते पण चाहत्यांना जे फोटो पाहण्याची प्रचंड उत्सुकता आहे,ते म्हणजे तिच्या दोन मुलींचे फोटो. पण मुलींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणं हा ठरवून घेतलेला निर्णय असल्याचं तिनं तिच्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. मुलींचे फोटो शेअर करण्यासंदर्भात क्रांतीला नेहमीच प्रश्न विचारण्यात येतो, पण त्यांच्या काळजीपोटी हा निर्णय घेतल्याचं तिनं म्हटलं आहे.' तुमच्या आतुरतेचा मी आदर करते. त्या मोठ्या झाल्या की त्यांचे फोटो शेअर करतील किंवा नाही. तो त्यांचा निर्णय असेल', असं क्रांतीनं तिच्या एका काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ivSauv