![](https://maharashtratimes.com/photo/77651385/photo-77651385.jpg)
मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यूचा तपास आता सीबीआय यंत्रणा करणार आहे. गेल्या दोन महिन्यात सुशांतच्या मृत्यू प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या, अनेक खऱ्या, खोट्या गोष्टी समोर आल्या आहेत. सुशांतचे मित्र , कुटुंबिय चाहते त्याच्याबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी आता शेअर करत आहेत. सुशांतचा मित्र हाओकिप यानं नुकताच सुशांत आणि अभिनेत्री यांच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. सारा अली खान हिनं केदारनाथ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटादरम्यान सुशांत आणि तिच्यात एका खास नात्याची सुरुवात झाली होती. परंतु असं काही तरी झालं त्यामुळं त्या दोघांनी एकमेकांपासून दूर राहणंच पसंत केलं. सॅमुअलनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यानं सुशांत आणि सारा एकमेकांच्या प्रेमात होते, असं म्हटलं आहे.‘केदारनाथ’च्या प्रदर्शनादरम्यान सुशांत आणि सारा यांच्यातली जवळीक वाढली होती. परंतु दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल न बोलणंच पसतं केलं होतं. काय म्हटलंय सॅम्युअलनं? मला आठवतंय की, सारा आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांचं प्रेम निरागस होतं. दोघांनाही एकमेकांबद्दल तितकाच आदर होता, जो आजकालच्या नात्यांमध्ये क्वचितच पाहायला मिळतो. सारा सुशांतसोबत होती तेव्हा, सुशांतच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा ती विचार करायची. त्याचे मित्र, कुटुंबिय इतकंच नव्हे तर त्याच्या कर्मचाऱ्यांचाही ती तितकाच विचार करायची, मला आश्चर्य वाटतं की, सुशांतचा 'सोनचिरैया' चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला त्यामुळं बॉलिवूड माफीयांकडून तिच्यावर ब्रेकअपसाठी दबाव टाकला गेला असावा का?
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31eaRxi