Full Width(True/False)

आसावरीचा बबड्या सुधारलाय का? महाराष्ट्र पोलिसांचं भन्नाट ट्विट

मुंबई: सोशल मीडियाद्वारे जनजागृती करण्यासाठी पोलिसांकडून त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर भन्नाट मिम्स शेअर केले जातात. काही मिम्स तर इतके व्हायरल होतात की, त्याची सर्वत्र चर्चा सुरू होते. असंच एक ट्विट महाराष्ट्र पोलिसांनी केलं असून या ट्विटची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू आहे. करोनाच्या काळात नागरिकांना नियम सांगण्यासाठी पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवरून वेळोवेळी ट्विट करण्यात येत आहेत. पण नागरिकांना नियम सांगताना ते मजेशीर पद्धतीनं कसं सांगता येईल, यावर भर दिला जातोय. यासाठी भन्नाट आणि मजेशीर कल्पना वापरून मिम्स बनवण्यात येत आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी एक ट्विट करताना चक्क आसावरीच्या बबड्याचं उदाहरण दिलंय.होय, '' मालिकेतील आसावरीच्या बबड्याचं मिम पोलिसांनी शेअर केलं आहे. सध्या 'अग्गंबाई सासुबाई' मालिकेची बरिच चर्चा होताना दिसतेय. या मालितकेतील काहीसं नकारात्मक असलेलं '' हे पात्र विशेष चर्चेत आहे. याचाच आधार घेत पोलिसांनी एक मिम तयार केलं आहे. बबड्याचा एक मास्क घातलेला फोटो शेअर करत तो एक जबाबदार नागरिक असल्याचं या मिममध्ये म्हटलं आहे. बबड्याच्या करामती, त्याचे कारनामे प्रेक्षकांना माहितंच आहेत, पण आता तो सुधारलाय, असं मालिकेत दाखवण्यात येत आहे. ‘कथानकात ‘ट्विस्ट’ आहे! बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही परंतु बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे'. या ट्विटच्या माध्यमातून पोलिसांनी मास्क वापरणं एक जबाबदार नागरिकाचं कर्तव्य आहे, असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QaMR80