Full Width(True/False)

रियाने सांगितली युरोपच्या हॉटेलमध्ये घडलेली विचित्र घटना

मुंबई- सुशांतसिंह राजपूतचा मृत्यूनंतर त्याच्या डिप्रेशनबद्दल अनेकदा बोललं गेलं आहे. सुशांतसोबत काम केलेल्या अनेकांनी स्पष्ट केलं की, युरोप ट्रीपवरून आल्यानंतर त्याची तब्येत बिघडायला लागली. यानंतर त्याने गोळ्या घेणं सुरू केलं. रियाविरुद्धच्या एफआयआरनंतर ही ट्रीप चर्चेचा विषय झाली होती. आता रियानेही अधिकाऱ्यांना आपला जबाब दिला आहे. याच ट्रीपमध्ये सुशांतच्या आजारपणाची लक्षणं दिसू लागली होती असं तिने स्पष्ट केलं. यूरोप ट्रीपनंतर बदलला सुशांत रिया आणि सुशांतने ऑक्टोबर २०१९ मध्ये यूरोप ट्रीपला गेले होते. त्याच्यासोबत काम केलेले सुरक्षारक्षक, स्वयंपाकी आणि त्याची सेक्रेटरी अंकिता आचार्य साऱ्यांनीच याला दुजोरा दिला. एका इंग्रजी वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, रियाने अधिकाऱ्यांना सांगितलं की या ट्रीपवेळी ते इटलीत ६०० वर्ष जुन्या हॉटेलमध्ये थांबले होते. या हॉटेलचे रूम फार मोठे होते आणि जुन्या फोटोंनी सजवलेले होते. मंत्रांचा जाप करायचा सुशांत तिथे एक पेन्टींग होतं. यात सॅटर्न (शनी) स्वतःच्याच मुलांना खात होता. रिया तिच्या भावासोबत शौविकसोबत दुसऱ्या खोलीत होती. ती जेव्हा सुशांतच्या खोलीत आली तेव्हा तिने पाहिलं की, सुशांत रुद्राक्ष घेऊन मंत्रांचा जाप करत होता आणि तो फार घाबरलेला होता. सुशांतला पेन्टिंगमध्ये दिसल्या व्यक्तिरेखा रियाने त्याला याबद्दल विचारले असता तो म्हणाला की त्या पेन्टिंगमध्ये त्याला माणसं दिसतं आहेत. पण नक्की काय दिसतंय हे तो नीट सांगू शकला नाही. त्या रात्री रिया आणि शौविक त्याच्याच रूममध्ये झोपले. यानंतर रियाने सुशांतला त्याला भ्रम झाला असं समजवण्याचा प्रयत्न केला. काही काळाने सुशांतनेही ते मान्य केलं. ऑस्ट्रियाला गेले असताना रिया त्याला घेऊन डेटॉक्स सेन्टरमध्ये गेली. पण सुशांतला तिथेही ठीक वाटत नव्हतं आणि मग ते तिथूनही निघालो. ट्रीपवरून आम्हाला २ नोव्हेंबरला परत यायचं होतं पण आम्ही २८ ऑक्टोबरलाच परत आलो. या ट्रीपवरून परतल्यानंतर सुशांतचा उत्साह पूर्णपणे गेला होता. तो तासन् तास शांत बसून रहायचा. मुंबईत आल्यावर त्याची तब्येत अजून बिघडली. तो कधी ओरडायचा तर कधी रडायला लागायचा. दरम्यानस, सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशीही सुरू आहे. तसेच मनी लॉण्ड्रिंगच्या प्रकरणात ईडीही चौकशी करत आहे. सुशांतच्या घरातल्यांच्या मते, सुशांत आजारी होता याची त्यांना कल्पनाच नव्हती. त्यांना कधी याबद्दल सांगण्यातही आलं नाही. रियाने कुटुंबियांना सांगितलं पाहिजे होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gKtEWa