Full Width(True/False)

'माझ्या घराचे हफ्ते मीच भरतेय'; अंकिताने शेअर केले बॅंंक स्टेटमेंट्स

मुंबई: अभिनेता मृत्यूप्रकरणात ईडीने कसून तपास सुरू ठेवला आहे. सुशांत मृत्यू प्रकरणात पैशांचा गैरव्यवहार झाल्याचा सक्तवसुली संचालनालयास (ईडी) संशय आहे. यासाठीच संचालनालयाकडून सुशांतच्या संबंधितांची कसून चौकशी आतापर्यंत करण्यात आली आहे. या चौकशीदरम्यान सुशांत त्याची एक्स गर्लफ्रेंड हिच्या घराचे हफ्ते भरत असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु अंकितानं हे सर्व आरोप फेटाळले असून तिनं तिची बाजू सर्वांसमोर मांडली आहे. अंकितानं तिच्या बॅंक अकाऊंटचे स्टेटमेटं सोशल मीडियावर शेअर केले असून काल पासून तिच्या घराच्या हफ्त्यांविषयी बोललं जात आहे, त्यात काहीच तथ्य नसल्याचं तिनं म्हटलं आहे. अंकितानं हे घराच्या हफ्त्यांविषयीची ही बाबा फेटाळली असून, 'मालाडमध्ये मी राहत असलेलं घर हे माझ्या नावावरच असून या घराचे बॅंकेचे हफ्ते मी माझ्या खात्यातून भरले आहेत. याच्याव्यतीरिक्त मला काहीच बोलायचे नाही', असं तिनं म्हटलं आहे. सुशांतच्या बहिणीनं दिली प्रतिक्रियाअंकिताच्या घराचे हफ्ते सुशांतच्या बॅंक अकाऊंटमधून जात असल्याचं म्हटलं गेल्यानंतर अंकितानं तिचे बॅंक डिटेल्स शेअर केले यावर सुशांतच्या बहिणीनं अंकिताचं कौतुक केलं असून तू एक स्वतंत्र मुलगी आहेस, त्याचा मला अभिमान आहे', असं तिनं म्हटलं आहे. सुशांत आणि अंकिता तब्बल सहा वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. २०१६ला ते लग्नही करणार होते. त्यामुळं त्यांनी एक घर खरेदी केलं होतं. दोघंही या घरात राहायचे. परंतू अचानक दोघांमध्ये काही तरी बिनचलं आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअप झाल्यानंतर सुशांतनं ते घर सोडलं आणि तो वांद्रे इथं घर भाड्यानं घेऊन राहू लागला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kTUhL1