Full Width(True/False)

सुशांत केसमध्ये सरकारी साक्षीदार होण्यास पिठाणी, दिपेश तयार!

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी आपल्यापरिने तपास करत आहे. या तपासात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सीबीआयच्या पथकाने आतापर्यंत , सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठाणी, घरगुती व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, स्वयंपाकी नीरज, दिपेश सावंत, केशव यांची चौकशी केली आहे. या चौकशीदरम्यान, सिद्धार्थच्या जबाबांमध्ये विरोधाभास जाणवला. याचदरम्यान अशाही बातम्या येत आहेत की, आणि यांनी सरकारी साक्षीदार होण्याची सीबीआयकडे विनंती केली आहे. जर असं झालं तर या प्रकरणात नवीन वळण येऊ शकेल. दोघांनीही सीबीआयकडे केली विनंती प्रकरणात सिद्धार्थ पिठाणी आणि दिपेश सावंत यांनी सरकारी साक्षीदार होण्याचं मान्य केलं आहे. सिद्धार्थ आणि दिपेश दोघांनीही स्वतःहून सीबीआयकडे सरकारी साक्षीदार होण्याची विनंती केली. सिद्धार्थ आणि दिपेश हे दोघंही ८ ते १४ जूनच्या काळात सुशांतसोबत त्याच्या घरी राहत होते. सिद्धार्थला गेस्ट हाउसमधून मुख्यालयात घेऊन गेली सीबीआय शुक्रवारी सकाळपासूनच सीबीआयची टीम सिद्धार्थ पिठाणीची चौकशी करत होती. दरम्यान सीबीआयने सिद्धार्थला डीआरडीओ गेस्ट हाउसमधून बाहेर काढून मुंबईतील सीबीआयच्या मुख्यालयात नेलं. डीआरडीओ गेस्ट हाउसमध्ये कमी खोल्या असल्यामुळे सिद्धार्थची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी त्याला मुख्यालयात नेण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. अज्ञात लोकांचीही करण्यात आली चौकशी सीबीआय मुख्यालयात यापूर्वी तीन ते चार अज्ञात व्यक्तींचीही चौकशी करण्यात आली. तसंच असं मानलं जात आहे की त्या दिवशी सीबीआयच्या मुख्यालयात दिपेश सावंतही उपस्थित होता. मात्र असं असलं तरी दिपेश आणि सिद्धार्थ या दोघांनाही सरकारी साक्षीदार करण्याआधी आवश्यक ती कागदपत्रांची जुळवा जुळव करेल आणि मगच हे प्रकरण पुढे नेईल. तपासाच्या आठव्या दिवशी रियाला विचारण्यात आले प्रश्न सीबीआयच्या पथकाने तपासाच्या आठव्या दिवशी पहिल्यांदा रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावलं होतं. सीबीआयच्या तीन वेगवेगळ्या पथकांनी लोकांची चौकशी केली. पहिल्या टीमने नीरज, सिद्धार्थ आणि सॅम्युएलची चौकशी केली. सीबीआयच्या एसपी नुपूर प्रसाद यांनी रियाला प्रश्न विचारले. तर तिसर्‍या टीमने रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीची चौकशी केली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jsMnXj