Full Width(True/False)

सुशांतसिंह राजपूत केस- आयपीएस ऑफिसर निघाले करोना पॉझिटिव्ह

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या टीममधील एका अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. मुंबई पोलिसांच्या टीममधील एका आयपीएस अधिकाऱ्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आणि त्यांच्या कुटुंबियातील सर्वच सदस्य करोना पॉझिटिव्ह निघाले. पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्या आयपीएस अधिकाऱ्यांना घरीच क्वारन्टीन करण्यात आलं आहे. सुशांतच्या मृत्यूचा तपासाची संपूर्ण जबाबदारी सीबीआयने आपल्या ताब्यात घेतली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संक्रमित अधिकाऱ्याने सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीची चौकशी केली होती. एवढंच नाही तर या प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआयची एक टीमदेखील अलीकडेच त्यांना भेटली होती. यापूर्वीही मुंबई पोलिसांच्या दोन आयपीएस अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. या महामारीमुळे आतापर्यंत ६२ मुंबई पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास ४ हजार ५०० पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. याच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयच्या पथकाने शनिवारी , शौविक चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठाणी, नीरज सिंग, केशव, सॅम्युअल मिरांडा आणि रजत मेवाती यांची चौकशी केली. तसेच आज रविवारीही रिया चक्रवर्तीची सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये रिया चक्रवर्तीची पहिल्या दिवशी सीबीआयने जवळपास १० तास चौकशी केली. दुसऱ्या दिवशीही तिला सीबीआयच्या कठीण प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे. यावेळी फक्त रियालाच नाही तर तिचा भाऊ शौविकलाही प्रश्न विचारणार आहे. रिपोर्टनुसार, रियाची चौकशी नुपूर प्रसाद करतील. त्याच रियाला या संबंधीचे सर्व प्रश्न विचारतील. मीडिया रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी रियाला युरोप ट्रिप, सुशांतसोबतचं तिचं नातं णि ८ जून ते १४ जूनमध्ये घडलेल्या घडामोडींसंदर्भात प्रश्न विचारले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QAL246