Full Width(True/False)

माझी लायकी हीच आहे की... बिहारच्या पोलीस महासंचालकांना रियाचं सडेतोड उत्तर

मुंबई: दिवंगत अभिनेता ( Death Case) प्रकरणाचा तपास सीबाआयकडून केला जात आहे.या प्रकरणात मुख्य आरोपी असलेली सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री हिनं नुकत्याच एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. तसंच अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. सुशांतच्या मृत्यूचा तपास . सर्वोच्च न्यायालायानं सीबीआयकडं सोपवण्याचा निर्णय दिल्यानंतर बिहारचे पोलीस महासंचालक (Bihar DGP ) यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना रियावर देखील निशणा साधला होता. तसंच रिया चक्रवर्ती हिच्याबद्दल बोलताना, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल बोलण्याची रियाची 'लायकी' नसल्याची टिप्पणीही त्यांनी यावेळी केली होती. गुप्तेश्वर पांड्ये यांच्या या वक्तव्यावर देखील रियानं त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.' मी सुशांतवर प्रेम केलं होतं. त्यामुळं बिहाराच्या मुख्यमंत्र्यांना देखील मी प्रश्न विचारू शकते, असं रियानं म्हटलं आहे. तसंच कुणीतर मला माझी लायकी सांगितली आहे, त्यांना मी सांगू इच्छीते की, सुशांतवर प्रेम करते हीच माझी लायकी आहे', असं रियानं म्हटलं आहे. काय म्हटलं होतं गुप्तेश्वर पांड्ये यांनी प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबाआयकडं सोपवण्याचे निर्देश दिल्यानंतर हा निर्णय पोलिसांचा विजय म्हणून पाहिला जात होता. हा निर्णय आल्यानंतर बिहारचे गुप्तेश्वर पांडेय (Bihar ) यांनी या निर्णयाचा आपल्याला खूपच आनंद झाला असल्याचं म्हटलं होतं. 'हा अन्यायाविरुद्ध विजय' असल्याची तसंच '१३० कोटी लोकांच्या भावनांचा विजय' पुष्टीही त्यांनी मीडियाशी बोलताना जोडली होती. 'न्यायालयाच्या या निर्णयामुळं सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान आणखीनच वाढेल. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात निश्चित रुपात न्याय मिळेल, अशी आशा लोकांमध्ये निर्माण झालीय' असं त्यांनी मीडियाशी बोलताना म्हटलं होतं. तसंच हिच्याबद्दल बोलताना, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल बोलण्याची रियाची 'लायकी' नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. सीबीआयकडून समन्स सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरू असून रिया चक्रवर्तीला सीबीआयनं समन्स बजावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयचं पथक सुशांत मृत्यू प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची चौकशी करत आहे. सुशांतनं आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली याचा तपास केला जात आहे. सीबीआयचं पथक सुशांतच्या घरीही गेले होते. तिथं त्यांनी 'क्राइम सीन रिक्रीएट'ही केला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32rEx9i