Full Width(True/False)

विरुष्कानंतर 'या' सेलिब्रिटी कपलनेही शेअर केली गुड न्यूज

मुंबई: आणि सैफ , यांनी गुड न्यूज दिल्यानंतर आणखी एका सेलिब्रिटीनं गुड न्यूज शेअर केली आहे. हिंदी मालिकांमध्ये प्रसिद्ध असेला अभिनेता करणवीर बोहरा यानं तो दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची गोड बातमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. करणवीरनं पत्नी टीजे सोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना सांगितली आहे. इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत त्यानं येणाऱ्या बाळासाठी खास मेसेज लिहिला आहे. करणीवरचा आज वाढदिवस असल्यानं हा दिवस त्यानं ही खास बातमी शेअर करण्यासाठी निवडला आहे. टीजे हिनं देखील बेबी बंपसह फोटोशूट शेअर केलं आहे. मुलं जगात येण्यासाठी आपली निवड करतात. हे सर्वकाही देवाच्या हातात असतं. खरं तर तोच एक महान निर्माता आहे. सर्व काही त्याच्या कल्पकतेनं घडवतो. आपण केवळ त्याच्या आशिर्वादाची वाट पाहत असतो. देवानं हे खास सरप्राइज दिल्याबद्दल त्याचे खूप खूप आभार. हे सर्वात सुंदर बर्थडे गिफ्ट आहे, असं करणवीरनं म्हटलं आहे. २००६मध्ये करणवीर आणि तीजे यांचं लग्न झालं होतं. त्यानंतर २०१६मध्ये त्यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. बेला आणि व्हिएना अशी त्यांची नावं आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3luoY9R