Full Width(True/False)

बॉलिवूडमधील घराणेशाही डिसलाइक; 'या' स्टारकिड्सना बसला मोठा फटका

कल्पेशराज कुबल सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये सुरू झालेला घराणेशाहीचा वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. देशभरातील प्रेक्षक याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा राग व्यक्त करत आहेत. या सगळ्याचा फटका स्टारकिड्सच्या आगामी चित्रपटांच्या प्रमोशनलादेखील बसताना दिसतोय. '', '' या चित्रपटांवर झालेला डिसलाइक्सचा भडिमार ही त्याचीच उदाहरणं. 'सडक-२' चा ट्रेलर १२ ऑगस्टला प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर या ट्रेलरला खूप ट्रोल करण्यात आलं. दिग्दर्शक महेश भट्ट, अभिनेत्री आलिया भट्ट आणि पूजा भट्ट आणि संजय दत्त यांच्या 'सडक-२'मध्ये मुख्य भूमिका आहेत. युट्यूबवर आजपर्यंत त्या ट्रेलरला डिसलाइक्स मिळत आहेत. २७ ऑगस्टच्या सकाळपर्यंत या ट्रेलरला १२.६० दशलक्ष डिसलाइक्स मिळाल्या होत्या. 'सडक-२' चा ट्रेलर सर्वाधिक डिसलाइक्स मिळणाऱ्या व्हिडीओमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर भारतात युट्यूबवर सर्वाधिक डिसलाइक्स मिळणाऱ्या व्हिडीओंमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. फक्त ६.९ लाख लोकांनी हा ट्रेलर लाइक केला आहे. अभिनेता अर्जुन कपूरनं अलीकडेच त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली. पण, त्यात तो स्वतःच ट्रोल झाला. घराणेशाहीच्या वादात अर्जुनला नेटकऱ्यांनी टार्गेट करत त्याच्या सिनेमांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन सर्वांना केलं. 'कुली नं. १'वर बहिष्कार डेव्हिड धवन दिग्दर्शित 'कुली नं. १' चित्रपटात त्यांच्याच मुलगा वरुण धवन मुख्य भूमिकेत आहे. तर सैफ अली खानची मुलगी सारा अली खान मुख्य अभिनेत्री आहे. सिनेविश्वातील कुटुंबियच मुख्य भूमिकेत असल्यानं प्रेक्षकांनी या चित्रपटाला ट्रोल करत बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. अभिनेत्री जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असलेल्या 'गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल' सिनेमाच्या प्रदर्शनावेळीदेखील असंच झालं होतं. प्रेक्षकांचा रोष का? 'सडक २'च्या ट्रेलरची ही अवस्था बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या घराणेशाहीच्या वादामुळे झाली आहे. सुशांतसिंहच्या जाण्यानंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही आणि गटबाजीवरुन घमासान सुरू आहे. त्यामुळे लोकांनी सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंड करुन आणि डिसलाइक करुन आपला रोष व्यक्त केला आहे. महेश भट्ट यांच्या 'सडक-२' मध्ये त्यांच्या दोन मुली आलिया भट आणि पूजा भट तसंच संजय दत्त आणि निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरचा छोटा भाऊ आदित्य रॉय कपूर अशी सिनेमाविश्वातील घराण्यातूनच आलेली कलाकार मंडळी असल्यानं डिसलाइक केलं जात असल्याचं दिसतंय. गाणंही डिसलाइकट्रेलर पाठोपाठ सिनेमातील गाण्यांनाही नेटिझन्स डिसलाइक करत असल्याचं पाहायला मिळतंय. 'दिल की पुरानी सडक' हे गाणे प्रदर्शित होताच अवघ्या काही तासांतच या गाण्यालाही डिसलाइक्सचा सामना करावा लागला. जवळपास ११ लाखांहून अधिक लोकांनी हे गाणं पाहिलं आहे. त्यातील ११ हजार लोकांनी लाइक केलं, तर ३१ हजार लोकांनी डिसलाइक केलं आहे. 'खाली पिली' डिसलाइक्सअभिनेता इशान खट्टर आणि अभिनेत्री अनन्या पांडे आगामी चित्रपटाचं नाव 'खाली पिली' असं आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला. हा टिझर प्रेक्षकांना फारसा आवडलेला नाही. 'सडक २'च्या ट्रेलरप्रमाणे प्रेक्षकांनी या टिझरवर डिसलाइक्सचा भडिमार केला आहे. काही तासांत सात लाखांपेक्षा अधिक डिसलाइक्स या टिझरला मिळाले आहेत. भारतातील सर्वाधिक नापसंत (टॉप ५) व्हिडीओ सडक २ ट्रेलर : डिसलाइक्स १२.६० दशलक्ष एक्सप्लोरिंग शिलाँग बाय मिस्टर फैजू : डिसलाइक्स ३६ लाख कॉमेडियन कुणाल कामराचा कॅरी मिनाटीला रिप्लाय : डिसलाइक्स २४ लाख आमिर सिद्दीकीचा कॅरी मिनाटीला रिप्लाय : डिसलाइक्स १० लाख ओरू अदार लव फ्रिक पेनी रॅप गाणं : डिसलाइक्स ९ लाख सिंबा चित्रपटातील आँख मारे गाणं : डिसलाइक्स ७ लाख


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QA0jCg