Full Width(True/False)

पुरावे नष्ट करू पाहत आहेत मुंबई पोलीस, वकिलांचा आरोप

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची केस दिवसागणिक गुंतागुंतीची होत चालली आहे. सुरुवातीला या मृत्यूच्या कारणाचा तपास करत होती. मात्र सुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी पटणातील राजीव नगर येथे रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांनीही या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली. आता बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. या सगळ्या गदारोळात बिहार पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याची कोणताही हक्क नाही असं रियाच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे. आता सुशांतच्या कुटुंबियांचे वकील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलिसांचे चौकशी रोकण्याचे प्रयत्न विकास सिंह यांनी पटणाचे एसपी विनय तिवारी यांना जबरदस्ती क्वारन्टीन केल्याबद्दल म्हणाले की, मला नाही वाटत की कोणतंही राज्य सरकार सरकारी अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने क्वारन्टीन करू शकतात. एका पोलीस अधिकाऱ्याला क्वारन्टीन करण्याचा स्पष्ट अर्थ हा आहे की तुम्ही चौकशीच रोखत आहात. पुरावे नष्ट करू पाहत आहेत मुंबई पोलीस विकास पुढे म्हणाले की, 'स्पष्ट बोलायचं झालं तर मुंबई पोलिसांना पुरावे नष्ट करण्यासाठी फक्त वेळ हवा आहे. याचमुळे आम्ही ही केस सीबीआयला देण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांनी या आधीच स्पष्ट केलं होतं की जर या केसमध्ये गरज पडली तर ते सीबीआयकडे ही केस सोपवतील.' बिहार सरकारने याआधीच स्पष्ट केलं होतं की, सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयद्वारे करण्यात यावी यासाठी ते शिफारीश करणार आहेत. तसेच मुंबई पोलीस बिहार पोलिसांनी अजिबात सहकार्य करत नसल्यामुळे तपासामध्ये अनेक अडथळेही निर्माण होत असल्याचं म्हटलं जात आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XmYcpi