Full Width(True/False)

दिशाच्या मृत्यूबद्दल कळताच बेशुद्ध झालेला सुशांत

मुंबई- मुंबई पोलिसांप्रमाणेच बिहार पोलीसही सुशांतसिंहर जाजपूत याच्या मृत्यूच गूढ उलगढण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या बिहार पोलीस शक्य तितक्या सर्व मार्गांनी सत्य शोधण्यात व्यग्र आहे. सुशांतच्या जवळील लोकांनी त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी मीडियासमोर शेअर केल्या. सुशांतच्या घरी राहणारा त्याचा मित्र यानेही यासंबंधीच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला. सिद्धार्थ म्हणाला की, ज्या दिवशी दिशा सालियनचा मृत्यू झाला तो संपूर्ण दिवस सुशांत खूप रडला होता. एवढंच नाही तर तिच्या मृत्यूची बातमी कळल्यावर तो बेशुद्धही झाला होता. सिद्धार्थ पुढे म्हणाला की दिशा फार कमी काळासाठी त्याची मॅनेजर होती. रिया निघून गेल्यावर दुसऱ्या दिवशी त्याची बहीण घरी राहायला आली होती. तिनेच सुशांतला जेवण भरवलं. दिशाच्या जाण्याचा त्याला मोठा मानसिक धक्का बसला होता. तो बेशुद्धही झाला होता. तेव्हा मी आणि त्याची बहीण त्याच्या खोलीतच होतो. याशिवाय घरी काम करणारी माणसंही सिद्धार्थकडे तक्रार करायची की रिया मॅडम सुशांत सरांच्या पैशांचा वापर करत आहेत. याबद्दल सिद्धार्थने सुशांतला सांगितलं तेव्हा सुशांत म्हणाला की, 'मला माहितीये रिया माझ्या पैशांचा वापर करतेय. पण तू या सगळ्यात पडू नकोस.' २०१९ मध्ये होणार होती पूजा दरम्यान, टाइम्स नाउच्या रिपोर्टनुसार, सुशांतच्या कुटुंबियांनी दावा केला आहे की, त्याच्या अकाउंटमधून दोन महिन्यात २ लाखांहून जास्त रुपये पूजेसाठी काढण्यात आले. ही पूजा २०१९ मध्ये होणार होती. या बँक अकाउंटची नॉमिनी सुशांतची बहीणच आहे. याचमुळे अकाउंट डिटेल समोर आले. सुशांतला त्याचा छोट्यात छोटा खर्च लिहून ठेवायची सवय होती. रियासाठी बाहेरून जेवणं आणलं तरी त्याची नोंद तो ठेवायचा. मग याच ट्रॅन्जॅक्शनची नोंद कशी ठेवली गेली नाही. त्याचमुळे हा खर्च कुठे झाला हे कळू शकलेलं नाही. स्वयंपाकीनेही दिली होती जादूटोण्याची बातमी सुशांतची बहीण मीतू सिंहची प्रतिक्रियाही समोर आली होती. यात मीतूला सुशांतच्या कूकने रिया जादूटोणा करायची असं सांगितलं होतं. राजपूत कुटुंबियांनी रियावर आरोप केला आहे की तिने सुशांतल्या त्याच्या कुटुंबियांपासून दूर केलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31lufHz