Full Width(True/False)

त्या रात्री सुशांत रात्री १ वाजता माझ्या खोलीत आला अन्...मित्रानं केला खुलासा

मुंबई: बॉलिवूड अभिनेता याच्या आत्महत्येचं गूढ निर्माण झालं असून त्याबाबत वांद्रे पोलिसांकडून कसून तपास सुरू असताना आता बिहार पोलिसांकडून तपास सुरू केला गेलाय. दरम्यान सुशांतच्या जवळच्या आणि त्याच्या सोबत राहणाऱ्या मित्रानं काही धक्कादायक खुलासे केले आहेत. नावाचा सुशांतचा मित्र त्याच्यासोबतच राहत होता. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यानं सुशांतनं आत्महत्या केलेल्या रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. 'ज्या दिवशी सुशांतनं आत्महत्या केली त्या दिवशी सुशांत नेहमीप्रमाणं शांतच होता. त्यानंतर संध्याकाळी आम्ही एकत्र जेवणही केलं. जेवताना आम्ही गप्पा मारल्या आणि नंतर आपापल्या खोलीत झोपायला गेलो. त्यानंतर रात्री एक वाजता सुशांत माझ्या खोलीत आला होता. त्यानं मला मी अजूनही झोपला का नाही असं विचारलं. त्यानंतर मी त्याला त्याच्या बेडरुममध्ये सोडून आलो. त्यानंतर सकाळी घरातल्या शेफनं त्याच्या रुमचा दरवाजा वाजवला, पण सुशांतन काही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मी आमच्या काही मित्रांना याबद्दल कळवलं. चावी वाला आल्यानंतर जेव्हा दार उघडलं तेव्हा सुशांतनं गळफास घेतल्याचं समोर आलं, असं सिद्धार्थनं सांगितलं आहे. सुशांतनं आत्महत्या केली त्यावेळी सिद्धार्थ घरातच होता. असं त्यानं पोलिसांना सांगितलं आहे. सिद्धार्थ हा सुशांतचा क्रिएिव्ह कंटेन्ट मॅनेजर काम पाहायचा. तो सुशांतच्या घरातच राहत होता. त्यामुळं या प्रकरणात त्याची चौकशी महत्त्वाची ठरत आहे. तो घरात असतानाही सुशांतनं गळफास लावून आत्महत्या केली. घरात असूनही त्याला यासंदर्भात काहीच कसं समजलं नाही... असे अनेक प्रश्न सध्या त्याला विचारण्यात येत आहेत. महेश शेट्टीनंही केला खुलासा सुशांतच्या वडिलांनी एफआयआरमध्ये विरोधत केलेल्या आरोपांनाही महेशनं दुजोरा दिला आहे. रिया आणि तिची आई सुशांतच्या आयुष्यातील प्रत्येकगोष्टीत हस्तक्षेप करायची असं महेशनं म्हटलं आहे. रिया आणि तिच्या आईनं सुशांतच्या घरातील सर्व कर्मचारी बदलले होते. सुशांतला त्याच्या घरच्यांसोबत बोलण्यातही दोघींनी बंधनं असायची. मित्र किंवा घरच्यांच्यासोबत बोलल्या नंतर सुशांत त्याचा फोन रिसेट करायचा असं महशे शेट्टीनं बिहार पोलिसांना सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी रियानं त्याच्या बॉडिगार्डला देखील कामावरून काढून टाकलं होतं.सुशांत आणि महेश यांचं शेवटचं बोलणं हे आत्महत्येच्या एक दिवसापूर्वी म्हणजेच १३ जून रोजी झाल्याचंही महेशनं पोलिसांना सांगितलं. तसंच सुशांतला कुर्ग इथं महेशसोबत ऑरगॅनिक शेत करण्याची इच्छा होती. परंतु रियानं त्याला विरोध केला होता.असंही महेशनं सांगितलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Pgxc6A