नवी दिल्लीः वर गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे उप राष्ट्रपती जोई बिडेन आणि एलन मस्क यांच्यासह १३० मोठ्या सेलिब्रिटीजचे अकाउंट हॅक केल्याप्रकरणी फ्लोरिडाच्या एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. या सर्वांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात या मुलाचा हात असल्याचे समोर आले आहे. तोच याचा मास्टर माइंड होता. हे अकाउंट्स हॅक करुन त्यावर बिटकॉइन पाठवण्यासंबंधी ट्विट केले होते. वाचाः हॅकिंगचे इतके मोठे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हे डेटा सिक्योरिटी टीमसाठी लज्जास्पद घटना आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, १७ वर्षाचा ग्राहम इवान क्लार्क या संपूर्ण हॅकिंगशी जोडलेला होता. आणि तोच याचा होता. फेडरल अथॉरिटीज ट्विटर हॅक करण्याआधी क्लार्कला ट्रॅक केले जात होते. अल्पवयीन मुलावर फ्रॉडचा गुन्हा दाखल करुन त्याची चौकशी केली जात आहे. वाचाः ५.२ कोटीच्या किंमतीचे बिटकॉईन केवळ १७ वर्षाचे वय असलेल्या क्लार्कने आपल्या शैतानी डोक्याने हॅकिंग केली होती. लीगल डॉक्यूमेंट्स नुसार, एप्रिल मध्ये एक सीक्रेट सर्विस ने त्याच्याकडे ७००००० डॉलर (जवळपास ५.२ कोटी) हून अधिक जास्त किंमतीचे बिटकॉईन जप्त केले होते. ट्विटर हॅकिंग १५ जुलै ला सुरु करण्यात आली. त्याचे ध्येय अजब होते. वेगळे युजरनेम चोरी करुन तो विकत होता. त्यानंतर हॅकर क्रिप्टोकरन्सीची मागणी करीत होता. वाचाः ट्विटरला बंद करावी लागली सिस्टम हॅक करण्यातआलेल्या ४५ अकाउंट्सला हॅकरने ट्विट केले आहे. ३६ अकाउंट्सला डायरेक्ट मेसेज अॅक्सेसकरण्यात आले होते. सात अकाउंट्सला सर्व माहिती डाउनलोड केली होती. हॅकरने इंटरनल ट्विटर सिस्टमला अॅक्सेस मिळवले होते. तसेच कंपनी कर्मचाऱ्यांची माहिती चोरून अॅक्सेस मिळाल्यानंतर युजर्स आणि पासवर्ड्स बदलले होते. त्यामुळे ट्विटरला पासवर्ड रिसेट करण्याची पूर्ण सिस्टम काही वेळासाठी बंद करावी लागली होती. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2CYXU16