Full Width(True/False)

मला विकत घेतलं जाऊ शकत नाही- अंकिता लोखंडे

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या निधनावर अंकिता लोखंडेने पहिल्यापासून आपलं मत स्पष्ट केलं आहे. बिहार पोलिसांनीही अभिनेत्रीचा जबाब नोंदवून घेतला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर चाहतेही अंकिताच्या सोशल मीडिया पोस्टवर लक्ष ठेवून आहेत आणि त्यावर कमेन्ट करतात. नुकतंच अंकिताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यात तिने एक कोट शेअर करत तिच्या सध्याच्या मनःस्थितीची जाणीव करून दिली. अंकिताने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'मी या जगातील असंख्य गोष्टींप्रमाणे स्वतःमध्ये बदल करू आणि त्यांच्यासमोर वाकू. पण हे माझ्यासाठी नाहीये. मी संतांच्या मार्गाने चालत आहे. देवीप्रमाणे माझा जन्म झाला आणि मला कोणीही वाहून नेऊ शकत नाही. मी माझ्या मनाचं ऐकते आणि आत्मा जे सांगतं तेच बोलते. मला विकत घेतलं जाऊ शकत नाही आणि कोणी विकूही शकत नाही.' अंकिताच्या या पोस्टला सुशांतच्या प्रकरणाशी जोडलं जात आहे. सध्या अंकिताची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे आणि अनेकजण यावर आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. तुला घाबरण्याची गरज नाही.. सत्याचा नेहमी विजय होतो असे कमेन्ट तिच्या पोस्टवर केल्या जात आहे. याआधीही अंकिताने सुशांतच्या अंत्यसंस्कारांना सहभागी न होण्याचं कारण सांगितलं होतं. अंकिता म्हणाली होती की, 'मी सुशांतच्या अंत्यसंस्कारांना गेली नाही कारण मी सुशांतला अशा स्थितीत पाहूच शकत नाही. याचमुळे अंत्यसंस्कारांना न जाण्याचा निर्णय पूर्णपणे माझा होता. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना भेटायला मी गेले. ते ठीक आहेत की नाही हे पाहायचं होतं. ज्याला जायचं होतं तो गेला पण डॅडी होते. ते ठीक आहेत की नाही हे पाहणं माझं कर्तव्य होतं. जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा त्यांचं दुःख पाहवतही नव्हतं.' याआधीही अंकिताने पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की सत्याचा विजय होईल. अंकिताची ही पोस्टही तुफान व्हायरल झाली होती. अंकिताच्या या पोस्टवर सुशांतच्या बहिणीनेही कमेन्ट केली होती. सध्या सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस स्वतंत्रपणे चौकशी करत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33p2d0l