दिल्ली: भारतीय रंगभूमीवरील ज्येष्ठ दिग्दर्शक यांचं आज निधन झालं. वयाचा ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नवी दिल्लीतल्या रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानं अलकाजी यांचं निधन झालं. भारतीय रंगभूमीसाठी त्यांचं मोलाचं योगदान आहे. भारतीय रंगभूमीवर एक प्रकारे त्यांनी क्रांतीच घडवली होती. १९४० -१९५० च्या दरम्यान मुंबईतील रंगभूमीवरील महत्त्वाच्या कलाकारांपैकी ते एक होते. ३७ व्या वर्षी अलकाजी मुंबईसोडून दिल्लीला गेले होते.त्यानंतर 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मध्ये तब्बल त्यांनी १५ वर्षे संचालक म्हणून मौल्यवान योगदान दिलं. संस्थेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा कार्यकाळ राहिला आहे. इब्राहीम अलकाजी यांच्या निधनानं भारतीय कलासृष्टीत भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याचं अनेक कलाकारांनी म्हटलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Xqmb77