Full Width(True/False)

'सुशांतसिंह राजपूतच्या केसशी निगडीत साक्षीदारांची होऊ शकते हत्या'

मुंबई- सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीला जसजसा वेळ लागतो आहे तेवढं हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं होत आहे. याचमुळे अभिनेत्याच्या कुटुंबाची चिंता सतत वाढत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की या प्रकरणात संबंधित साक्षीदारांना धमकावले जात आहे. यामुळे तपासात अडचणी निर्माण होऊ शकतात. याबद्दल बोलताना सुशांतचा चुलत भाऊ नीरज कुमारसिंग बबलू यांनी आपलं मत स्पष्ट केलं. साक्षीदारांना धमकवण्यात येत आहे एएनआयच्या ट्वीटमध्ये सांगण्यात आलं आहे की, सुशांतसिंग राजपूतचा चुलत भाऊ आणि भाजपचे आमदार नीरज कुमारसिंह बबलू यांनी सुशांत प्रकरणातील साक्षीदारांना धमकावले जात असल्याचा आरोप केला आहे. त्या साक्षीदारांना संरक्षणही देत नसल्याचं बबलू यांनी यावेळी स्पष्ट केलं. साक्षीदारांना पोलीस संरक्षण देण्यात यावं नीरजकुमार बबलू यांनी असेही म्हटलं की ज्या प्रकारे गोष्टी समोर येत आहेत अशात साक्षीदारांनाही मारले जाऊ शकते. याचमुळे साक्षीदारांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी आमची मागणी आहे. मुंबई पोलिसांनी सुशांतची सर्व डायरी नेल्या दरम्यान, सुशांतच्या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, दिवसेंदिवस प्रकरण सुटण्याऐवजी ते अधिक गुंतागुंतीचं होत आहे. यापूर्वीही नीरज कुमार बबलू यांनी अभिनेत्याच्या डायरीशी छेडछाड केल्याचा आरोप केला होता. नीरजकुमार यांच्या मते सुशांतला डायरी लिहायची सवय होती. त्याच्या निधनानंतर मुंबई पोलिसांनी सुशांतच्या सर्व डायरी त्यांच्या समोर नेल्या. मुंबई पोलिसांनी डायरींशी छेडछाडही केली आहे. पण डायरीत राहिलेलं जे काही पोलिसांना मिळालं त्यात लोकांना सुशांतचे भविष्यातल्या योजना दिसतील. वकील म्हणाले- महत्वाची माहिती बाहेर आणू नका दुसरीकडे सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी माध्यमांना विनंती केली आहे की या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित महत्वाची माहिती समोर आणू नये. कारण त्यामुळे प्रकरणाच्या चौकशीला धोका निर्माण होऊ शकतो आणि कुटुंबियांना न्याय मिळविण्यात अडचणी येऊ शकतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hb1AM3