Full Width(True/False)

'तुझ्यावर सुशांतच्या हत्येचा आरोप आहे', प्रश्न ऐकताच संतापली रिया

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मनी लॉण्ड्रिंग केसची तपासणी सध्या करत आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी सोमवारी पुन्हा एकदा रियाला चौकशीसाठी ईडीच्या ऑफिसमध्ये बोलावले होते. यावेळी रिया तिच्या भावासोबत शौविक चक्रवर्ती आणि वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांच्यासोबत पोहोचली होती. यावेळी रियाला मीडियाने अनेक प्रश्न विचारले. रिया ऑफिसमध्ये जात असताना मीडिया प्रतिनिधींपैकी एकाने तिला प्रश्न विचारला की, 'तुझ्या कुटुंबावर सुशांतच्या हत्येचा आरोप आहे, यावर तुझं काय म्हणणं आहे?' हा प्रश्न ऐकताच रियाला प्रचंड राग आला. तिने रागात रिपोर्टरकडे पाहिले. तिला काही तरी बोलायचे होते पण भावाने तिला सांभाळले आणि तिला ऑफिसमध्ये घेऊन गेला. दरम्यान, ईडीने सुशांतच्या बँक अकाउंटच्या चौकशीत शुक्रवारी रियाची आठ तासांहून अधिक तास चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत रियाने अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने उत्तरं न दिल्यामुळे तिला आज पुन्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावले. शुक्रवारी रियाच्या चौकशीनंतर शनिवारी तिच्या भावाची शौविकची १८ तास चौकशी करण्यात आली.आता सोमवारी पुन्हा एकदा रियाची चौकशी करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी ६.३० वाजता तो ईडीच्या ऑफिसमधून बाहेर पडला होता. ईडीने केलेल्या चौकशीत हे समोर आलं आहे की, रिया चक्रवर्तीचे मुंबईत खार पूर्वेला आणि नवी मुंबईत फ्लॅट आहे. यानंतर ईडीने रियाला गेल्या पाच वर्षांचे इनकम टॅक्स रिटर्न दाखवण्याची मागणी केली. सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबियांनी रियाने सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप केला होता. तसेच सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये ईडीने रिया चक्रवर्तीशी केलेल्या चौकशीत अनेक खुलासे होत आहेत. या सर्वाची सुरुवात सुशांतच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपयांची हेराफेरी केल्यापासून झाली. सुशांतच्या सीएनेही काही रक्कम घेतला असल्याचा आता संशय व्यक्त केला जात आहे. सुशांतच्या कंपनीचं अकाउंट सांभाळणाऱ्या दोन सीएच्या अकाउंटमध्ये मार्चमध्ये काही रक्कम गेल्याचं खुलासा रियाने ईडीच्या टीमकडे केला. २ कोटी ६५ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतने त्याच्या मोठ्या बहिणीच्या नावे साडेचार कोटी रुपयांची केली होती. मात्र सुशांतच्या आयुष्यात रिया आल्यानंतर रिया तिचा भाऊ शौविक आणि दोन सीएच्या मदतीने त्या एफडीमधले जवळपास अडीच कोटी रुपये काढले. यानंतर एफडी फक्त २ कोटींचेच राहिले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XOL4JY