मुंबई: अभिनेता याच्या मृत्यूचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. तसंच मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडी मार्फतही हिची चौकशी सुरू आहे. असं असताना तिचे कॉल रेकॉर्ड डिटेल्स देखील समोर आले आहेत.रियाच्या या कॉल रेकॉर्ड डिटेल्समधून अनेक गोष्टींचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. रियाच्या कॉल रेकॉर्ड्स डिटेल्समधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुशांत काही कामानिमित्त बाहेर गावी गेला होता, तेव्हा रियानं चित्रपट निर्माते महशे भट्ट यांच्यासोबत तब्बल ९२ मिनिटं गप्पा मारल्या होत्या. सुशांतच्या मृत्यूनंतर रिया आणि यांच्यातिल नात्याची बरित चर्चा झाली होती. त्यामुळं सुशांत बाहेर गावी असताना रिया आणि महेश भट्ट यांच्यात फोनवर ९२ मिनिटे नक्की काय बोलणं झालं हे महत्त्वाचं आहे. महेश भट्ट यांनी रियाला सात वेळा कॉल केले होते, तर रियानं महशे भट्ट यांना १६ कॉल केले आहेत. तसंच गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांपैकी एक व्यक्ती रियाला मदत करत असल्याचं म्हटलं जात होतं. या कॉल रेकॉर्ड डिटेल्समध्ये एका अधिकाऱ्याचं नाव समोर येत आहे.बिहार पोलिस दलातील डीजीपी गुप्तेश्वर पांड्ये यांनी मुंबई पोलिसांपैकी एकजण रियाला मदत करत असल्याचा आरोप केला होता. रियाच्या कॉल रेकॉर्ड डिटेल्समध्ये डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांचं नावं आलं आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर रियानं चार वेळा फोन द्वारे संपर्क केला होता. तर एक एसएमएस पाठवण्यात आला होता. डीच्या चौकशीत लपवला एक फोन नंबररियाचा भाऊ शौविकची ईडीने १८ तासांहून जास्त काळ चौकशी केली. रविवारी सकाळी ६.३० वाजता तो ईडीच्या ऑफिसमधून बाहेर पडला. आता रियाच्या वडिलांना इंद्रजीत चक्रवर्ती यांनाही ईडीचा समन्स पाठवण्यात आला आहे. दरम्यान, ईडीनं रियाला विचारलेल्या प्रश्नांची माहिती समोर आली आहे. रियाला तिचे सर्व इलेक्ट्रॉनिक गोष्टी जमा करण्यास सांगण्यात आले होते. मात्र यावेळी तिनं स्वतःच्या आणखी एका फोन नंबरची माहिती दिली नाही. विशेष म्हणजे रिया तो दुसरा नंबरही नियमितपणे वापरते. आता ईडी रियाचा हिडन डेटा डाउनलोड करण्याच्या तयारीत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33JfjFV