मुंबई :इंडस्ट्रीमधील घराणेशाहीवरुन वाद रंगलेला असतानाच आणखी एका स्टारकिडची बॉलिवूडमध्ये एंट्री होणार आहे. ती म्हणजे अभिनेता याची मुलगी . एका मुलाखतीत संजय कपूर यांनी याविषयी माहिती दिली. या मुलाखतीमध्ये संजय यांना शनायाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा शनाया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विषाणूमुळे उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे तिच्या पदार्पणाला उशीर झाला आहे. शनायानं यापूर्वी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून एका चित्रपटासाठी काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला '' या चित्रपटासाठी तिनं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. अनेक स्टार्सची मुलं इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना, आता शनायामुळे या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. दरम्यान, हिंदी सिनेसृष्टीत स्टारकिड्सचं वर्चस्व आहे हे खरं. पण, त्याबरोबरच असेही अनेक जण आहेत ज्यांनी कुणीही गॉडफादर नसताना, सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही इथे पाऊल टाकलं. आपल्या गुणवत्तेच्या आणि मेहनतीच्या जोरावर ते यशाच्या शिखरावर पोहोचले. कुणी इंडस्ट्रीचा 'किंग' बनला आहे, तर कुणी बॉलिवूडचा सबसे तेज 'खिलाडी' आहे. त्यांचं नाव आता इतकं मोठं आहे, की इंडस्ट्रीतले निर्माते त्यांना साइन करण्यासाठी धडपडत असतात. त्यांच्या नावावर चित्रपट धो-धो कमाई करतात
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31xPXJn