मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यू प्रकरणी आता नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) लवकरच चौकशी सुरू करणार आहे. सुशांत प्रकरणात अंमली पदार्थांचा काही संबंध आहे, याची चौकशी एनसीबीकडून करण्यात येईल. याच संदर्भातला एक महत्त्वाचा खुलासा सुशांतची गर्लफ्रेंड हिनं केला आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान रियानं अनेक गोष्टींचा खुलासा करताना सुशांतच्या आयुष्यातील खासगी गोष्टींचा खुलासा देखील केला आहे. एखादी व्यक्ती जग सोडून गेल्यानंतर त्याच्या वाईट सवयींबद्दल असं सांगावं लागतंय, याचं वाईट वाटतंय, पण हो सुशांत ड्रग घेत होता. 'मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला , तो त्याच्या मर्जीनं त्याचं आयुष्य जगायचा', असं रियानं म्हटलं आहे.सुशांत ड्रग घ्यायचा पण मी कधीही ड्रग्स सेवन केलं नाही, असं स्पष्टीकरणही रियानं दिलं आहे. दरम्यान, सुशांत प्रकरणात अंमली पदार्थांचा काही संबंध आहे, याची चौकशी एनसीबीकडून करण्यात येईल. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे संचालक राकेश अस्थाना यांनी ही माहिती दिलीय. 'आम्ही सुशांत प्रकरणाची चौकशीही सुरू करत आहोत', असं एनसीबीकडून सांगण्यात आलं आहे. सुशांतसिंह राजपूतकडं नोकरी करणार्या नीरज सिंगनं सुशांत हा गांधा ओढत असल्याचा दावा केला होता. नीरजनं मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबातून ही माहिती समोर आली आहे. मृत्यूच्या काही दिवस आधी त्यानं सुशांतसाठी गांजाची सिगारेट बनवून दिली होती. ज्या दिवशी सुशांतसिंहचा मृतदेह बेडरूममध्ये लटकलेला आढळला त्या दिवशी गांजा ठेवण्यात येणारा बॉक्स तपासला होता. तो बॉक्स रिकामा होता, असं नीरजनं पोलिसांना होतं
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lqlIMn