मुंबई: अभिनेता मृत्यू प्रकरणात केंद्राच्या अधिसूचनेनंतर केंद्रीय अन्वेषण विभागानं (Central Bureau of Investigation - CBI) तपास आपल्या हाती घेतला आहे. या प्रकरणात सीबीआयनं सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. सीबीआयनं सुशांतची कथित गर्लफ्रेंड , इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल केलीय. सीबीआयची टीम सध्या बिहार पोलिसांच्या संपर्कात आहे.सीबीआयकडून प्रकरणाचा तपास सुरू असताना ''मार्फतही रियाची चौकशी सुरू आहे. सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी हिनं ईडीच्या चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाचे खुलासे केल्याचं समोर आलं आहे. सुशांतच्या वडिलांनी श्रुतीवरही काही आरोप केले आहेत.या संदर्भात तिनं तिची बाजू मांडली आहे. मी सुशांतच्या बिझनेचसंदर्भात अनेक प्रोजेक्टवर काम केलं पण कधीही गैरव्यवहार केला नाही, असं तिनं म्हटलं आहे. तर सुशांतच्या आयुष्यात रिया आल्यानंतर तिच सर्व महत्त्वाचे मोठे आर्थिक निर्णय घ्यायची,असा महत्त्वाचा खुलासा तिनं केला आहे. केवळ आर्थिकच नव्हे तर सुशांतचे अनेक प्रोफेशन निर्णयही रियानं घेतले होते, असंही श्रुतीनं तिच्या जबाबात म्हटलं आहे. सुशांतसोबतच रियाच्याही काही बिझनेस प्रोजेक्टसाठी काम केलं असल्याचीही माहिती श्रुतीनं ईडीच्या चौकशीत दिली आहे. २०२०नंतर मात्र, सुशांत आणि रिया दोघांनाही फार कमी वेळा भेटल्याचं तिनं सांगितलं आहे. दरम्यान,काल म्हणजेच सोमवारी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची मुंबईच्या अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात चौकशी सुरू होती. या तिघांसह ईडी श्रुती मोदीचीही चौकशी करत आहेत. शुक्रवारी सुमारे आठ तासांहून अधिक काळ रियाची चौकशी करण्यात आली होती. सोमवारीही तिची जवळपास १०.३० तास चौकशी सुरू होती. ईडीला रियाकडून तिचं उत्पन्न, खर्च आणि गुंतवणूकी संबंधीची सर्व उत्तरं हवी आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, रियाने 14 लाख रुपयांचा आयटीआर दाखल केला आहे, पण तिची गुंतवणूक त्याहून जास्त आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kCN2Hc