नवी दिल्लीः जर तुम्हाला जबरदस्त मोबाइल कनेक्शन आणि डेटा स्पीड हवा असेल तर पोस्टपेड प्लान जबरदस्त ऑप्शन असू शकते. प्रीपेड प्लान सुद्धा काही कमी नाहीत. परंतु, पोस्टपेड प्लान अनेक युजर्संसाठी जबरदस्त व्हॅल्यू ऑफर करीत आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या खूप सारे प्लान्स पोस्टपेड युजर्संसाठी आणत आहे. वोडाफोनकडे रेड फॅमिली प्लान आहे. बाकी कंपन्या सुद्धा लो कॉस्ट पोस्टपेज प्लान ऑफर करीत आहे. वाचाः भारती एअरटेलचे लो कॉस्ट पोस्टपेड प्लान ४९९ रुपयांचा मंथली प्राईसवर मिळतो. यात ७५ जीबी डेटा बेनिफिट मिळतो. एकदा हा डेटा संपल्यानंतर या प्लानमध्ये डेटा रोलओवरचा ऑप्शन मिळतो. सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा मिळते. या प्लानमध्ये एका वर्षाचे अॅमेझॉन प्राईम आणि एअरटेल एक्सट्रिम अॅपचे सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानमध्ये हँडसेट प्रोटेक्शन मिळतो. तसेच या प्लानसोबत एअरटेल थँक्स मेंबरशीप मिळते. या मेंबरशीप सोबत व्हीआयपी सर्विस, शो अकादमीचे एक वर्षापर्यंत सब्सक्रिप्शन Wync प्रीमियम सर्विस आणि फ्री हेलो ट्यून मिळते. वाचाः रिलायन्स जिओच्या स्वस्त पोस्टपेड प्लानची किंमत १९९ रुपये आहे. या प्लानमध्ये केवळ २५ जीबी डेटा युजर्संना मिळतो. पोस्टपेड कॅटेगरीत या प्लानमध्ये २५ जीबी डेटा संपल्यानंतर प्रत्येक १ जीबी डेटासाठी २० रुपये खर्च करावे लागतात. या प्लानसोबत सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा मिळते. तसेच रोज १०० फ्री एसएमएस दिले जातात. कंपनी सर्व जिओ अॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन प्लान ऑफर करीत आहे. वाचाः वोडाफोन वोडाफोनच्या पोस्टपेड सर्विस सर्व ऑपरेटर्सच्या तुलनेत चांगली आहे. यासाठी युजर्संना ३९९ रुपये खर्ज करावे लागतात. युजर्सला ४० जीबी डेटा मिळतो. गरज पडल्यास डेटा रोल ओव्हर द्वारे २०० जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग देणाऱ्या या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस मिळते. यात कंपनी ओटीटी बेनिफिट्स सुद्धा ऑफर करते. ४९९ रुपयांच्या किंमतीच्या वोडाफोन प्ले आणि ९९९ रुपये किंमतीचा झी ५ प्रीमियम सब्सक्रिप्शन या प्लानमध्ये मिळते. वाचाः वोडाफोनकडे फॅमिली प्लान्सची एक कॅटेगरी आहे. ज्यात ५९८ रुयपांपासून या प्लानची सुरुवात होते. यात दोन कनेक्शन एकत्र सर्विसचा फायदा घेता येवू शकतो. यात ८० जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये प्रायमरी युजर्सला ५० जीबी आणि सेकंडरी युजरला ३० जीबी डेटा मिळतो. बाकी बेनिफिट्स मागच्या प्लानसारखेच आहेत. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2DJKiaf