Full Width(True/False)

अंकिताचा बॉयफ्रेंड विकी जैननं पहिल्यांदाच शेअर केली सुशांतसाठी खास पोस्ट

मुंबई: अभिनेता याच्या आत्महत्येनंतर त्याच्या मागची कारणं शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुशांतच्या वडिलांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर या प्रकणाला वेगळं वळण आलं असून सुशांतची एक्स गर्लफ्रेंड देखील या सुशांतच्या आत्महत्येचं खरं कारण सर्वांसमोर यावं यासाठी पुढं आली आहे. अनेक वृत्त वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीतल तिनं सुशांतच्या आयुष्यासंदर्भात अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. सुशांतच्या निधनानंतर अंकितानं सुशांतसाठी अनेक पोस्ट शेअर केल्या पण पहिल्यांदाच तिचा बॉयफ्रेंड यानं देखील सुशांतसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. सुशांत मृत्यूचं नेमकं कारणं समोर यावं यासाठी सुशांतचे कुटुंबिय सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. यासाठी त्याची बहिणी श्वेतासिंह किर्ती हीनं जस्टीस फॉर सुशांत ही मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेला अंकितानं तर पाठिंबा दिलाच आहे पण तिच्या बॉयफ्रेडंन देखील या माहिमेचा एक भाग म्हणून सुशांतसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.श्वेता सिंह किर्ती हिनं सुशांतसाठी ग्लोबल प्रेयर मीट म्हणजेच ऑनलाइ प्रार्थनासभेचं आजोयन केलं आहे. याच प्रार्थना सभेत सहभागी होण्याचं आवाहन विकी जैन यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमधून केलं आहे. दरम्यान, सुशांतच्या निधनानंतर अंकिता देखील या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तिनं सुशांतसाठी अनेक पोस्ट शेअर केल्यात, त्यामुळं तिचा आणि यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चा केवळ अफवा असल्याचं तिनं एका मुलाखतीतल म्हटलं आहे. मी विकीला डेट करतेय, आणि त्याच्यासोबत खूष आहे, असंही अंकितानं स्पष्ट केलं आहे. सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताच्या आयुष्यात विकी जैन आला. अंकितानं काही महिन्यांपूर्वीच विकीसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. दोघांचा साखरपुडा देखील झाला असल्याच्या चर्चा आहेत. सुशांतच्या निधनानंतर विकीवर देखील नेटकऱ्यांनी टीका केली होती. त्यामुळं त्यानं सोशल मीडियावरंच कमेंट सेक्शन बंद केलं होतं. कधी सुटणार हे कोडं? दोन महिन्यापूर्वी म्हणजेच १४ जून रोजी बॉलिवूड अभिनेता याचा मृत्यू झाला. दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला तरी देशात इतकंच नाही तर परदेशातही त्याच्या मृत्यूची चर्चा होताना दिसतेय.१४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्यानं आत्महत्या केली असं पोलिसांनी सांगितलं होतं. परंतु त्या दिवसापासून आजपर्यंत या प्रकरणात अनेक गोष्टी समोर आल्या, सुशांतच्या मृत्यू प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या, असं असलं तरी सुशांतचा मृत्यून नेमका कसा झाला याचं कोडं आजही उलगडू शकलं नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3asVq7s