पुणे: 'एक, दोन, तीन, चार...गणपतीचा जयजयकार'च्या जयघोषात घराघरात, मंडळांमध्ये श्रीगणरायाचं आगमन झालं आहे. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर वातावरणच वेगळं आहे. आनंद असला, तरी नियमांच्या चौकटीत राहूनच उत्सव साजरा करावा लागणार आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील घरी बाप्पाचं स्वागत केसं आहे. खास डेकोरेशन केलं आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांनी त्यांच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. परंतु घरात बाप्पासाठी त्यांनी केलेला देखावा वादग्रस्त ठरला आहे. प्रवीण तरडे यांनी त्याच्या कल्पकतेतून त्यांनी यंदा पुस्तक गणपती हा देखावा केला होता. त्यानंतर त्यांनी हे फोटो सोशल मीडियार शेअर केले. पण चाहत्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केलं. त्याच्यावर राज्यभरातून टीका होऊ लागली. प्रविण तरडेंनी बाप्पाच्या डेकोरेनशसाठी पुस्तकांचा वापर केलाय. बाप्पाच्या आजुबाजुला पुस्तकांची आरास आहे. पण बाप्पाला संविधानावर विराजमान केलं आहे. याचमुळं अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरडे यांनी माफी मागाणी अशी मागणी करण्यात येत होती. अखेर त्यांनी व्हिडिओ शेअर करत सर्वांची माफी मागितली आहे. आणि त्यांची ती पोस्ट देखील डीलिट केली आहे. 'माझ्या घरी यंदा बाप्पासाठी पुस्तक गणपती अशी संकल्पना होती. बुद्धीची देवता आणि बुद्धीचं सर्वात मोठं प्रतिक अशी माझी भावना होती. असं असलं तरी मी केलेली चूक अनेकांनी माझ्या लक्षात आणून दिली. आरपीआय, भीम आर्मी तसंच लातूर आणि पुण्यातील संघटनांनी मला याची जाणीव करुन दिली. मी सर्व दलित बांधवांची, ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची सर्वांचीच जाहीर माफी मागतो', असं तरडे यांनी त्यांच्या व्हिडिओत म्हटलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2EgdvtD