Full Width(True/False)

सत्य समोर आलंच पाहिजे, सुशांतला शांत झोप लागली पाहिजे

नवी दिल्ली- सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू कसा झाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. ३५ पानांच्या निर्णयामध्ये कोर्टाने या प्रकरणातून सत्य बाहेर येणं का महत्त्वाचं आहे ते स्पष्ट केलं. सुशांतच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून सत्य बाहेर येणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. हुशार अभिनेत्याचा अकाली मृत्यू सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणाची कोण चौकशी करणार याचा निर्णय घेणार होतं. सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केली. यानंतर रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत ही केस मुंबईत ट्रान्सफर करण्याची मागणी केली होती. यावर निर्णय देताना न्यायालयाने स्पष्ट केलं की, मुंबई पोलिसांनी तपास योग्य प्रकारे केला नाही. त्यामुळे बिहार सरकारला हे प्रकरण सीबीआयकडे पाठविण्याचा पूर्ण अधिकार आहे. यासोबतच तपासाचे सर्व अधिकारही सीबीआयकडे देण्यात आले आहेत. ३५ पानांमध्ये आपला निर्णय स्पष्ट केला. तास स्पष्ट शब्दात लिहिले की, सुशांतसिंह राजपूत हा एक प्रतिभावान अभिनेता होता, आपली संपूर्ण क्षमता सिद्ध करण्यापूर्वी त्याचा अकाली मृत्यू झाला. त्याचं कुटुंब, मित्र आणि प्रियजन तपासाच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत, जेणेकरून सर्व अनुमानांवर पूर्णविराम लावता येईल. तक्रारदात्याने गमावला त्यांचा एकुलता एक मुलगा म्हणूनच, स्वच्छ आणि निःपक्षपाती चौकशी होणे ही काळाची गरज आहे. फिर्यादीने आपला एकुलता एक मुलगा गमावला आहे आणि तपासात जो काही निकाल येईल ते त्यांच्यासाठी न्यायाचं माप असेल. तसेच रिया यांच्यासाठीही हा एक न्यायच असेल कारण त्यांनीही सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ...जेणेकरून सुशांत शांत झोपू शकेल सुप्रीम कोर्टाने पुढे म्हटले की, निःपक्षपाती चौकशी केल्यास त्या लोकांनाही न्याय मिळेल ज्यांच्याविरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. तसेच दिवंगत सुशांतलाही शांत झोप लागेल. सत्यमेव जयते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Q8VVdu