मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सुशांतचे वडील यांनी आणि यांना सुशांतची विचारपूस करण्यासाठी मेसेज केला होता. यावरून वडिलांचं मुलांसोबत बोलणं होत नसल्यामुळे ते फार चिंतीत होते. सुशांतच्या वडिलांनी दोघींना गेल्या वर्षी मेसेज केले होते, जेव्हा रिया आणि सुशांत लिव्ह- इनमध्ये होते. २९ नोव्हेंबर २०१९ ला केला होता मेसेज सुशांतच्या वडिलांचे व्हॉट्सअप चॅट आता समोर आले आहेत. गेल्या वर्षी २९ नोव्हेंबरला त्यांनी रियाला मेसेज टाकले होते. या मेसेजवरून कळतं की त्यांचं सुशांतशी अजिबात बोलणं होत नव्हतं. त्याच्या प्रकृतीबद्दल त्यांना चिंता सतावत होती. या मेसेजमध्ये सुशांतच्या वडिलांनी लिहिले की, 'जेव्हा तुला कळलं की मी सुशांतचा वडील आहे तर बोलत का नाहीयेस. अखेर गोष्ट काय आहे? एक मैत्रीण होऊन त्याची काळजी घेतेस आणि त्याच्यावर उपचार करतेस तर सुशांतबद्दल जाणून घेणं माझंही कर्तव्य आहे. त्यामुळे फोन करून मला त्याच्या तब्येतीची माहिती दे.' सुशांतच्या वडिलांनी दुपारी १२.३० वाजता हा मेसेज केला होता. सुशांतच्या वडिलांनी श्रुती मोदीलाही मेसेज पाठवले होते. तेव्हा श्रुती सुशांतची बिझनेस मॅनेजर होती. त्याच दिवशी श्रुतीला मेसेज करत केके सिंह म्हणाले की, 'मला माहितीये की सुशांतची सर्व कर्ज आणि त्यालाही तू पाहत आहेस. त्याची प्रकृती कशी आहे याबद्दल जाणून घ्यायचे आहे. काल त्याच्याशी बोलणं झालं तो सांगत होता की तो फार चिंतीत आहे. एक बाप म्हणून मला किती काळजी वाटत असेल याचा तू विचार करू शकतेस. त्यासाठी मला तुझ्याशी बोलायचं होतं. आता तुला माझ्याशी बोलायचं नाही तर मी मुंबईला येत आहे. माझ्यासाठी एक फ्लाइटचं तिकीट बुक करून दे.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gMgub3