Full Width(True/False)

'ही' गोष्ट सांगून रियानं सुशांत आणि त्याच्या बहिणीमध्ये लावलं होतं भांडण

मुंबई: बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. या दरम्यान सुशांतच्या कुटुंबाचे वकिल आणि त्याची गर्लफ्रेंड हिचे वकिल यांच्याकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. प्रकरणात दररोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. रियानं सुशांतला त्याच्या कुटुंबापासून दूर ठेवलं असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. हे सांगताना राजपूत कुटुंबाचे वकिल यांनी एका घटनेचा उल्लेख केला आहे. सुशांतची बहिण प्रियांका आणि तिचे पती काही दिवसांसाठी सुशांतच्या मुंबईतील घरी आले होते. याच दरम्यान त्यांची आणि रियाची ओळख झाली होती. प्रियांका आणि तिचे दिल्लीला परत जात होते. परंतु सुशांतनं त्याच्या बहिणीला थांबायची विनंती केली. ती त्याच्या घरी आणखी काही दिवस थांबली. एके दिवशी रियानं तिच्या भावाच्या बर्थडे पार्टीसाठी सुशांतला आणि त्याच्या बहिणीला घरी बोलावलं होतं. परंतु सुशांतनं मी थकलो आहे हे सांगून बर्थडे पार्टीत येण्यास नकार दिला. रियानं प्रियांकाला पार्टीसाठी येण्याचा हट्ट धरला. प्रियांकाचा तिनं मेकअपही केला. पण रियाच्या घरी गेल्यानंतर तिच्या भावाचा बर्थडेच नाही हे तिला सांगण्यात आलं. पार्टीनंतर रिया आणि प्रियांका दोघीही सुशांतच्या घरी आल्या. त्यानंतर प्रियांका झोपायला तिच्या खोली गेली. रिया आणि सुशांत गप्पा मारत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियांका उठल्यानंतर रिया घरात नव्हती. सुशांत प्रचंड चिडलेला. रियानं सुशांतला काही गोष्टी सांगितलेल्या त्यामुळं तो प्रियांकावर प्रचंड रागावला होताय 'बर्थडे पार्टीनंतर प्रियांकानं माझी छेड काढली, माझा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला असं' रियानं सुशांतला सांगितलं होतं. सुशांत प्रियांकाचं काहीही ऐकण्याच्या पलीकडं गेला होता. हे लक्षात आल्यानंतर प्रियांका तिथून निघून गेली. त्यानंतर अनेक महिने प्रियांका आणि सुशांत एकमेकांसोबत बोलत नव्हते. या सर्व प्रकारानंतर सुशांतनं स्वत: प्रियांकाची माफी मागितली होती. असं राडपूत कुटुंबियांच्या वकिलांनी म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kdM3wO