नवी दिल्लीः टीव्ही मेकर कंपनी ने भारतात ६ नवीन टीव्ही लाँच केले आहेत. याची किंमत ११ हजार ९९० रुपयांपासून ते ३३ हजार ९९० रुपयांपर्यत आहे. ग्राहकांना हे टीव्ही अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, , आणि रिलायन्स डिजिटल वरून खरेदी करता येवू शकते. याची विक्री ६ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. या ६ अल्ट्रा एचडी आणि अँड्रॉयड टीव्ही शिवाय कंपनी तीन आणखी मॉडल घेऊन येण्याची शक्यता आहे. कंपनी ६ ते ९ ऑगस्ट दरम्यान आपल्या टीव्हीवर ५ वर्षाची वॉरंटी देत आहे. वाचाः मॉडलची किंमत किती कंपनीने Hisense A71F सीरीज अंतर्गत तीन ४के डिस्प्ले आणि Hisense A56E सीरीज अंतर्गत तीन फुल एचडी डिस्प्लेचे टीव्ही लाँच केले आहेत. ३२ इंचाच्या फुल एचडी टीव्हीची किंमत ११ हजार ९९० रुपये, ४० इंचाचा फुल एचडी डिस्प्लेच्या टीव्हीची किंमत १८ हजार ९९० रुपये आणि ४३ इंचाच्या मॉडलची किंमत २० हजार ९९० रुपये आहे. तर ४के सीरीजमध्ये ४३ इंचाच्या मॉडलची किंमत २४ हजार ९९० रुपये, ५० इंचाच्या मॉडलची किंमत २९ हजार ९९० रुपये आणि ५५ इंचाच्या मॉडलची किंमत ३३ हजार ९९० रुपये आहे. वाचाः काय आहे खास Hisense 4K TV पॅनल्स मध्ये डॉल्बी एचडीआर टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे जबरदस्त पिक्चर क्वॉलिटी मिळते. जबरदस्त साउंडसाठी यात डॉल्बी एटमॉसचा सपोर्ट मिळतो. वेगवान कनेक्टिविटीसाठी यात ड्यूल बँड वायफाय सपोर्ट देण्यात आला आहे. सर्व टीव्ही अँड्रॉयड टीव्ही ९.० वर काम करतात. गुगल असिस्टेंट व गुगल प्ले स्टोरसोबत येतात. वाचाः यात बिल्ट इन क्रोमकास्ट आणि व्हाईस वर काम करणारा रिमोट देण्यात आला आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही ब्लूटूथ हेडफोन सुद्धा कनेक्ट करू शकता. ४के टीव्ही रेंड मध्ये बेजल लेस डिझाइन दिली आहे. तसेच हे अल्ट्रा डिमिंग टेक्नोलॉजी सोबत येते. ३२ इंचाचा मॉडलमध्ये २० वॉट स्पीकर्स, ४३ इंचाच्या मॉडलमद्ये २४ वॉट स्पीकर्स, ५० इंच आणि त्यापेक्षा मोठ्या मॉडलमध्ये ३० वॉट साउंड आउटपूट मिळणार आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Polu9N