पाटणा, बिहारः अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूवरून महाराष्ट्र आणि बिहारमध्ये राजकीय आरोपांच्या फैरी झडत आहेत. आता तर याच्या वडिलांच्या वकिलांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या हेतूवरच प्रश्न उपस्थित केला आहे. सुशांतसिंह राजपूतचा पोस्टमार्टम रिपोर्ट दिला गेला. पण या रिपोर्टमध्ये त्याच्या मृत्युची वेळ आणि कारण स्पष्ट केलं गेलेलं नाही, असं सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह म्हणाले. सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टवरच सवाल उपस्थित केला आहे. 'सुशांतसिंह राजपूतचा पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाला आहे. पण यामध्ये सुशांतचा मृत्यू कशामुळे? सुशांतची हत्या करून त्याला लटकवलं गेला का? की त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली? यासंदर्भात पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काहीच स्पष्ट करण्यात आलेलं नाही. एवढचं नव्हे तर त्याच्या मृत्युची वेळच देण्यात आलेली नाही, असं वकील विकास सिंह म्हणाले. अनुपम खेर यांनी केली महेश भट्ट यांची पाठराखण बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणावरून निर्माते महेश भट्ट यांची पाठराखण केलीय. अनुपम खेर यांनी 'टाइम्स नाउ' या वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. सुशांतच्या मृत्युनंतर महेश भट्ट यांच्यावर आरोप केले जात आहेत. यामुळेच सोशल मीडियावर महेश भट्ट यांच्या 'सडक २' चित्रपटाच्या ट्रेलवरून टीकाही होतेय. तसंच विरोधकांनी मोहीमही उघडल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांची पाठराखण केलीय. यावर आपल्याला काहीही बोलायचं नाहीए. पण आपण आंधळे नाही आहोत, असं म्हणत अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांचे आभारही मानले. महेश भट्ट यांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे. याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत, असं अनुपम खेर म्हणाले. सुशांतच्या मृत्युनंतर अनेक चित्रपट निर्मात्यांवर आरोप होत आहेत. त्यात महेश भट्ट यांचाही समावेश आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही सुशांतसिंहच्या बाबतीत सर्वाकाही सल्ले महेश भट्ट यांच्याकडून घेत होती, असा आरोप करण्यात येतोय.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Y3cqvI