Full Width(True/False)

एस.पी.बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनकच; पत्नीही करोना पॉझिटिव्ह

चेन्नई: प्रसिद्ध गाय यांची प्रकृती चिंताजक असताना आता त्यांच्या पत्नीला देखील करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ५ ऑगस्टला करोनाचं निदान झाल्यानंतर एस.बी. बालसुब्रमण्यम यांना चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ते उपचारांना चांगलाप्रतिसाद देत होते. अचानक गुरुवारी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी आयसीयूत हालवण्यात आलं आहे. एस.पी. बालसुब्रमण्यम यांना आयसीयूत हालवण्यात आल्यानंतरही त्यांची प्रकृती खालावली त्यामुळं त्यांना आयसीयूत लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं आहे. त्यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत असून बालसुब्रमण्यम यांच्या कुटुंबियांकडून त्यांची प्रकृती खालावली असली तरी स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. ते लवकरच बरे होतील, असं त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. बालसुब्रमण्यम यांच्या पत्नी सावित्री यांना देखील करोनाची लागण झाली असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. करोनावर तयार केलं होतं गाणं आता रुग्णालयाच्या प्रशासनाकडून अधिकृत स्टेटमेन्ट जारी करण्यात आलं आहे. यात बालसुब्रमण्यम यांची प्रकृती खालावली असून त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आल्याचं सांगितलं आहे. सध्या प्रत्येकजण ते या आजारातून लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत. प्रत्येकालाच त्यांना पुन्हा गाताना पाहायचं आहे. या दरम्यान एसपी बालसुब्रमण्यम यांनी करोना व्हायरसवर एक गाणंही तयार केलं होतं. त्यांनी आपल्या गाण्यातून जनजागृती अभियान चालवलं होतं. त्यांचं हे गाणं प्रेक्षकांनाही आवडलं होतं. आता ते स्वतः या व्हायरसशी लढा देत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Y4FTFF