मुंबई: बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यूप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) त्याची गर्लफ्रेंड हिला समन्स पाठवल्यानंतर आज तिची दुसऱ्यांदा चौकशी सुरू आहे. काही वेळापूर्वी रिया मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाली असून सुशांतची केस मनी लॉण्ड्रिंगशी जोडली गेली असल्यामुळे ईडीनं तिच्या मालमत्तेविषयी माहिती घेण्यात येत आहे. त्यामुळं रियाच्या वकिलांनी काही गोष्टी पुरावे म्हणून सादर केले आहेत. दोन दिवसांपूर्वी रियानं तिच्या आणि सुशांतच्या व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रिन शॉट्स शेअर केले होते. या चॅटमध्ये सुशांत त्याच्याबहिणीबद्दल बोलताना दिसतोय. सुशांत आणि त्याच्या बहिणीचं भांडण झालं असताना सुशांत त्याच्या बहिणीला दृष्ट असं म्हणाताना दिसतोय. तर रिया सुशांत आणि त्याच्या बहिणीचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतेय, असं दिसून येतंय. पण रियानं शेअर केलेल्या चॅटवरून अनेकांनी तिला याचा आणि सुशांतच्या खटल्याचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे , तर अभिनेत्री हिनं देखील तिला सुनावलं आहे. बहिण भावांमध्ये भांडणं होतंच असतात, त्यात काही मोठी गोष्ट नाहीए. महत्त्वाचं म्हणजे तो तुझ्यासोबत राहत होता, त्याच्या बहिणीसोबत नाही. त्याचे क्रेडिट कार्ड्स तू वापरत होती, त्याची बहिण नाही', असं काम्यानं म्हटलं आहे. काम्यानं हे ट्विट केल्यानंतर अनेक जण त्याच्यावर प्रितिक्रिया देत आहेत. दरम्यान, सुशांतच्या कुटुंबियांना त्याच्या विम्याचे पैसे हवे आहेत, त्यामुळं त्यांनी माझ्यावर खोटे आरोप करत खटला दाखल केला असं, रियानं म्हटलं असल्याची माहिती आहे. तसंच माझं आणि सुशांतचं नातं त्याच्या घरच्यांना मान्य नव्हतं. पण सुशांतला माझ्यासोबतचं नातं तोडायचं नव्हत. त्यामुळं त्यानं त्याच्या कुटुंबियांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता, असं रियानं म्हटलं आहे. मला फसवण्यामागं सुशांतच्या भावोजींचं र्व षड्यंत्र असल्याचा आरोप रियानं केला आहे. चौकशीच्या पहिल्या फेरीत रियासह तिचा भाऊ शौविक, वडील तसेच सुशांतची पूर्वाश्रमीची मॅनेजर यांचीही चौकशी करण्यात आली. ८ तासांच्या चौकशीनंतर हे सर्वजण ईडी कार्यालयातून बाहेर आले तेव्हा माध्यमांनी मोठी गर्दी केली होती. काहीवेळ तिथे गोंधळही निर्माण झाला. पोलिसांनी या सर्वांना वाट करून दिली. जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पुढं ढकलण्यात यावी, ही विनंती घेऊन रियानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं रियाचा विनंती अर्ज फेटाळला. त्यामुळेच ईडीकडून आधीच बजावण्यात आलेल्या समन्सनुसार रियाला ईडीचं कार्यालय आज गाठावं लागलं. रिया व इतरांच्या चौकशीनंतर याप्रकरणात आज सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी याची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. ईडीकडून त्याला तसे समन्स बजावण्यात आले आहे. दुसरीकडे सीबीआयनेही याप्रकरणी एफआयआर नोंदवून गुरुवारपासूनच तपासाला सुरुवात केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ijM9kC