Full Width(True/False)

सेलमध्ये १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळताहेत हे स्मार्टफोन

नवी दिल्लीः ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर Big Saving Days सेल सुरू आहे. हा सेल १० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनसह अनेक प्रोडक्टवर सूट दिली जात आहे. काही स्मार्टफोन या सूटनंतर १० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. फ्लिपकार्ट सिटी बँक क्रेडिट व डेबिट कार्ड आणि ICICI बँक क्रेडिट कार्ड्सवर १० टक्के तात्काळ डिस्काउंट दिला जात आहे. तुम्हाला जर दहा हजारांपेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे. वाचाः Realme Narzo 10A फोनच्या ६४ जीबी मॉडलची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये या फोनवर १ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे हा फोन या सेलमध्ये ९९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. स्मार्टफोनमध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो G70 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी दिली आहे. तसेच या फोनमध्ये 12MP + 2MP + 2MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः Oppo A5s ओप्पो Oppo A5s स्मार्टफोन 2GB + 32GB मॉडलला फ्लिपकार्टवर ७ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकते. याची किंमत १२ हजार ९९० रुपये आहे. स्मार्टफोनमध्ये ६.२ इंचाचा HD+ डिस्प्ले, मीडियाटेक 6765 प्रोसेसर आणि 4230mAh बॅटरी दिली आहे. तसेच या फोनमध्ये 13MP + 2MP मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः Redmi 8 या फोनवर एक हजार रुपयांचा डिस्काउंट दिला आहे. 4GB + 64GB मॉडलची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्ट सेलमध्ये या फोनला ९९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. स्मार्टफोनमध्ये ६.२२ इंचाचा HD+ डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये 12MP + 2MP रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः Infinix Hot 9 4GB + 64GB मॉडलला फ्लिपकार्टवर ९ हजार ४९९ रुपयात खरेदी करता येवू शकते. याची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.६ इंचाचा HD+ डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो P22 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये 13 MP + 2 MP + 2 MP + लाइट लेन्सचा रियर कॅमेरा दिला आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः Motorola G8 Power Lite या स्मार्टफोनवर कोणत्याही प्रकारची सूट दिली नाही परंतु, 4GB + 64GB मॉडलची किंमत ९९९९ रुपये आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे 5000mAh बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा HD+ डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो P35 प्रोसेसर, 16MP + 2MP + 2MP रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31yFdtm