नवी दिल्लीः बीएसएनएलने आपल्या युजर्ससाठी ८४९ रुपयांचा नवीन ब्रॉडबँड प्लान आणला आहे. कंपनीने या प्लानचे नाव 'Fibro 425GB per Month CS359 CUL'ठेवले आहे. यात युजर्संना 100Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड दिली जात आहे. कंपनी या प्लानला सध्या प्रमोशनल ऑफर अंतर्गत उपलब्ध करीत आहे. युजर या प्लानला ५ ऑक्टोबर २०२० पर्यंत सब्सक्राईब करु शकते. वाचाः प्लानमध्ये मिळतात हे बेनिफिट बीएसएनएलच्या या प्लानमध्ये 425GB डेटा पर्यंत 100Mbps ची स्पीड मिळणार आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर ही स्पीड कमी होऊन 2Mbps होते. प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये यात देशभरात कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग दिली जात आहे. वाचाः कंपनीने या प्लानला आता मध्य प्रदेशच्या युजर्ससाठी लाँच केले आहे. या प्लानला मंथली आणि वार्षिक सब्सक्रिप्शन सोबत दोन आणि तीन वर्षापर्यंत सब्सक्राईब केले जावू शकते. वार्षिक प्लानची किंमत १० हजार १८८ रुपये आहे. तर दोन वर्षासाठी सब्सक्राईबर्स केल्यास २० हजार ३७६ रुपये, आणि तीन वर्षापर्यंत सब्सक्रायबर्स केल्यानंतर ३० हजार ५६४ रुपये द्यावे लागतील. युजर्संना आकर्षित करण्यासाठी कंपनी मोठ्या सब्सक्रिप्शन करणाऱ्या युजर्संना विना कोणताही चार्जचे चार महिन्यांपर्यंत सब्सक्रिप्शन फ्री देत आहे. वाचाः 30Mbps चा प्ला झाला लाँच कंपनीने सध्या मध्य प्रदेश च्या युजर्संसाठी प्रमोशन बेसिसवर ५९९ रुपयांचा आणखी एक प्लान आणला आहे. या प्लानमध्ये 30Mbps ची इंटरनेट स्पीड ऑफर करीत आहे. प्लानचे नाव 'Fibro 300GB per Month CS360 CUL' आहे. या प्लानला १ सप्टेंबर २०२० पासून सब्सक्राईबर्स केले जावू शकते. वाचाः ३०० जीबी डेटा लिमिट संपल्यानंतर मिळणारी स्पीड कमी होऊन ती २ एमबीपीए होते. या प्लानमध्ये देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल आणि एसटडी कॉलिंगची सुविधा दिले जाते. या प्लानला युजर एक, दोन, तीन वर्षासाठी सब्सक्राईब करु शकतात. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33yyTEw