मुंबई: रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळून मोठी घडल्यानंतर पुन्हा एकदा धोकादायक आणि अनधिकृत इमारतींचा मुद्दा चर्चेत आला आहे. यामुद्द्यावर अभिनेता आणि दिग्दर्शक , निर्माता यांनं सुचक असं ट्विट केलं आहे. सोमवारी संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान महाडमधील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. तर, आत्तापर्यंत १८ रहिवाशांचा शोध सुरु आहे. तर, ७८ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याघटनेनंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुबोधनं इमारत असो वा समाज,पाया हा मजबुतच हवा; असं ट्विट केलं आहे. त्याचं हे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. सुबोधनं वेळोवेळी सामाजिक मुद्द्यावर त्याचं मत माडंल आहे. महाडमध्ये जे घडलं ते अत्यंत दुर्देवी आहे. जखमी आहेत ते लवकर बरे होवोत आणि मृतांच्या कुटुंबियांना या दु:खातून बाहेर पडण्याची ताकद ईश्वर देवा, असंही सुबोधनं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, महाड दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन इमारतीचं बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल केला आहे. तसंच, तत्कालीन मुख्याधिकारी, आर्किटेक्चर, नगरपालिका इंजिनीअर आणि आरसीसी कन्सल्टन्स अशा पाच जणांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. बिल्डरला अटक करण्यासाठी मडाड येथून पथक रवाना झालं असल्याचं, माहिती समोर येत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32m8c3T