मुंबई: गावांतील आणि दुर्गम पाड्यातील शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड आणि जिद्द असते. पण साधनं , मार्ग आणि आर्थिक साहाय्याच्या अभावामुळे त्यांचं स्वप्न अपूर्ण राहते. त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायची गरज असते. गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीअभावी या विद्यार्थ्यांचं शिक्षण अर्धवट राहण्याची शक्यता असते. हलाखीच्या परिस्थितीसोबत झगडत दहावीच्या परिक्षेत तब्बल ९९.६० गुण मिळवत डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलेल्या एका विद्यार्थिनीला अभिनेते आणि खासदार डॉ. यांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ दिलं आहे. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. 'डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारी आमलेवाडी, बोतार्डे, तालुका. जुन्नर येथील ही दहावीच्या परीक्षेत ९९.६० गुण मिळवून उत्तीर्ण झाली. अतिशय गरीब कुटुंबातील ऋतुजाच्या पंखास बळ देण्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याला प्रतिसाद देत ''च्या वतीने तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले', अस अमोल कोल्हे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इतकंच नाही तर करोनामुळं ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू झाल्यानं ऋतुजाच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी तिला एक अॅन्ड्राइड मोबाइल फोनही तिला भेट म्हणून 'जगदंब प्रतिष्ठान'च्या वतीनं देण्यात आला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ajTuhv