Full Width(True/False)

एक आकडा चुकला आणि रिया ऐवजी दुसऱ्यालाच मिळाल्या शिव्या

मुंबई- सध्या प्रत्येकाच्याच तोंडी सुशांतसिंह राजपूतचं प्रकरण रेंगाळत आहे. अनेकांना या केसमध्ये पुढे काय झालं हे जाणून घेण्याची इच्छा आहे. पण ३२ वर्षीय सागर सुर्वेला मात्र या केसचा मनःस्ताप झाला आहे. त्याने आतापर्यंत १५० हून अधिक नंबर ब्लॉक केले आहेत आणि तासन् तास तो स्वतःचा फोन बंदच ठेवत आहे. त्याचं झालं असं की लोकांना त्या मुलाचा नंबर हा रिया चक्रवर्तीचा नंबर असल्यासारखंच वाटलं. रिया आणि सागरच्या फोन नंबरमध्ये फक्त एका आकड्याचा फरक आहे. सागर एका शैक्षणिक संस्थेत क्लार्क आहे. मुंबई मिररच्या अहवालानुसार सागर सुर्वेला गेल्या एका आठवड्यापासून धमकी आणि अपमानजनक फोन येत होते. सुरुवातीला त्याने १५० हून अधिक नंबर ब्लॉक केले. पण याचाही काही फायदा नाही हे समजल्यावर त्याने स्वतःचा फोन बंद ठेवणं योग्य समजलं. दरम्यान, सुशांतसिंग राजपूत च्या वडिलांनी केके सिंह यांनी आपल्या अहवालात वर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आणि पैशांसाठी सुशांतला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचे आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांनंतर सोशल मीडियावर रियाला बलात्काराच्या आणि मृत्यूच्या धमक्याही मिळत आहेत. सागरने सांगितले की लोक त्याला कॉल करून रिया चक्रवर्तीबद्दल विचारतात. लोक सागरला मेसेज, व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून धमकी देणारे मेसेज पाठवतात. सुरुवातीला सागर प्रत्येकालाच हा चुकीचा नंबर लावल्याचं सांगत होता. पण यावरही लोक समोरून त्याला त्याचाच फोटो मागवू लागले. सागर म्हणाला की, आधी त्याने या कॉल आणि मेसेजकडे दुर्लक्ष केलं पण नंतर पुढील तीन दिवसांमध्ये परिस्थिती अधिक बिकट झाली. एका वृत्त वाहिनीने सुशांत आणि रियाचे कॉल रेकॉर्ड दाखवताना रियाचा नंबर देखील दाखवला होता. यानंतर सागरच्या चुलत भावाने त्याला सांगितले की त्याच्या आणि रियाच्या फोन नंबरमध्ये फक्त एकाच अंकाचा फरक आहे. सागरने यासंदर्भात पोलिसांत तक्रार केली असता पोलिसांनी त्याला दुसरा नंबर वापरण्याचा सल्ला दिला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31L8vow