मुंबई: मराठी सिनेसृष्टीतला अभिनेता यांच्या निधनानंतर त्याच्या आईनं सोशल मीडियावर लिहिलेली एक पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ११ ऑगस्ट रोजी आशुतोषनं ३२ वा वाढदिवस साजरा केला असता, पण त्यापूर्वीच त्यानं त्यांचं आयुष्य संपवलं आणि जगाचा निरोप घेतला. आशुतोषच्या निधनानंतर १३ दिवसांनी त्याच्या आई यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यांनी आशुतोषच्या डिप्रेशन संदर्भात लिहिलं आहे. डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी घरच्यांनी केलेले प्रयत्न, त्याची घेतलेली काळजी हे सर्व त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या सुनेबद्दल म्हणजेच अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्याबद्दल जे काही लिहिलं आहे ते वाचून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आल्याच्या प्रतिक्रिया येत आहे. मयुरीनं ज्या प्रकारे आशुतोषची काळजी घेतली, डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी तिनं किती प्रयत्न केले हे सांगताना त्यांनी मयुरीचं कौतुक केलं आहे. आशुतोषसाठी तिनं अनेक मालिकांच्या ऑफर्स येत असताना त्यांना नकार दिला. आशुतोषला तिनं प्राधान्य दिलं. हे सांगताना त्यांनी 'केवळ आशुच्या आग्रहाखातर नाट्य व सिनेसृष्टीशी टच राहावा म्हणून एखादे नाटक व सिनेमा स्वीकारला. ह्या काळात मयुरीने त्याच्या पत्नीच्या व्यतिरिक्त त्याची मैत्रिण , मार्गदर्शक, आणि विशेष म्हणजे त्याची आई होवून लहान बाळा प्रमाणे काळजी घेतली', असं लिहिलं आहे. 'आशुच्या दहाव्याच्या कार्यक्रमानंतर रितीरिवाजानुसार मयुरीला तिच्या आई वडिलांबरोबर पाठवावे असे सर्व नातेवाईक यांचे म्हणणे प्रमाणे ठरले. घाटावरून दहाव्याचा कार्यक्रम आटोपून सर्व नातेवाईक परतले नंतर सर्वांसमोर मयुरी ने तिच्या आई वडिलांना सांगितले की रुढीपरंपरेनुसार मी तुमचे बरोबर यायला पाहिजे, पण इथे मम्मी व पप्पा एकटेच पडतील, अभिलाष देखील दूर अमेरिकेत आहे, आता त्यांना माझी गरज जास्त आहे त्यामुळे मी त्यांचे जवळ नांदेड येथेच थांबते. मी तुमच्याकडे येतांना त्यांना दहा पंधरा दिवसांसाठी घेवून येते. केवढी ही प्रगल्भता इतक्या कमी वयात या माझ्या मुलीत ( मला दोन्ही मुलंच असल्याने मयुरीला मी कधीच सून मानले नाही ) . ती आमची सून नसून मुलगीच आहे हे मला तेव्हा प्रकर्षांने जाणवले', असं आशुतोषच्या आईनं म्हटलं आहे. नैराश्याला चेहरा नसतो नैराश्याला चेहरा नसतो, नाहीतर सर्वांना हसवणारा, नेहमी मदत करणारा आशु असं करूच नसता शकला.या विषयावर गांभीर्याने विचार आणि चर्चा केली पाहिजे तरच आपण अशा नैराश्याच्या रुग्णांना मदत करू शकू. नैराश्य हा खराखुरा अस्सल व त्रासदायक आजार , त्याकडे दुर्लक्ष करु नका .एकमेकांना मदत करा मानसिक आधार द्या , रुग्ण नक्कीच बरा होवू शकतो. ह्या रुग्णांकडे सकारत्मकतेने पाहा; असं म्हणत त्यांनी डिप्रेशनवरही भाष्य केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kGnIzX