Full Width(True/False)

बाबा माझी हत्या करू शकतात, अभिनेत्रीने वडिलांवर केले आरोप

बरेली- कुमकुम भाग्य फेम अभिनेत्री हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तिने वडील राम रतन शंखधर यांच्यापासून तिच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं. तृप्ती शंखधर म्हणाली की वडिलांची तिने लग्न करावं अशी इच्छा आहे. यासाठी तिला जबरदस्तीही केली जात आहे. याला विरोध केल्याने वडिलांनी तिला मारले. इतकंच नाही तर वडिलांनी तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तृप्तीने केला आहे. याचमुळे अभिनेत्रीने आपल्या आईसोबत घर सोडलं. ट्विटरच्या माध्यमातून तृप्तीने या प्रकरणाची तक्रार केली. यावर बारादरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तृप्तीच्या वडिलांना ताब्यात घेत तपास सुरू केला. तृप्तीसोबत तिच्या आईनेही घर सोडलं. आईनेही नवऱ्यावर मारपीट केल्याचा आरोप केला. तृप्तीची आई म्हणाली की, "मला बाहेर जाऊ दिलं जायचं नाही आणि मला कोणाशी बोलूही दिलं जायचं नाही. या सर्व गोष्टींमुळे मी खूप अस्वस्थ होते.' बारादरी येथील ग्रीन पार्क रहिवासी राम रतन शंखधर यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. त्यांची मोठी मुलगी दिप्ती पीसीएसची तयारी करत आहे. त्याचवेळी लहान मुलगी तृप्ती शंखधर (१९) ही अभिनेत्री आहे. गेल्या वर्षभरापासून ती मुंबईत राहत आहे. तृप्ती होळीसाठी घरी आली होती त्यानंतर ती लॉकडाउनमुळे घरीच राहिली. तृप्तीने अपलोड केला व्हिडिओ दरम्यान, तिचा एक व्हिडिओ अचानक इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे, यात ती आपल्या आईसोबत दिसत आहे. तृप्तीने वडील राम रतन यांच्यावर जीवे मारण्याचा आरोप केलाय. यासोबतच ती म्हणाली की, 'बाबांनीच मला मुंबईत अभिनेत्री होण्यासाठी पाठवलं होतं. यानंतर माझा फक्त एकच सिनेमा प्रदर्शित झाला. बाबा आता २८ वर्षीय मुलाशी लग्न करण्याचा दबाव टाकत होते. त्याच्याशी लग्न केलं नाही तर ठार मारू असंही ते म्हणाले.’ तृप्तीने स्पष्ट केलं की, यानंतर ती आपल्या आईसह घरातून पळून गेली आणि हा व्हिडिओ अपलोड केला. वडिलांनी दिलं स्पष्टीकरण या संपूर्ण प्रकरणात तृप्तीच्या वडिलांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, 'लग्नासाठी तिच्यावर कुठलाही दबाव टाकला नाही. अभिनेता सुशांतसिंहचा मृत्यू ज्या पद्धतीने झाला त्यानंतर मलाही भीती वाटू लागली आहे. याचमुळे मला आता मुलीचं लग्न करायचं आहे. याच कारणास्तव मुंबईत तुप्तीने एकटं राहू नये असंही मला वाटतं. पण तिला मुंबईला एकटंच रहायचं होतं. रागात मी तिला कानाखाली मारली. त्यानंतर मी अन्न- जल त्याग केला.' याप्रकरणी एसपी सिटी रवींद्र कुमार म्हणाले की, 'अभिनेत्री तक्रारीवरून तिच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुलगीही पोलीस ठाण्यात आहे. लेखी तक्रार मिळाल्यावरच गुन्हा दाखल करण्यात येईल’


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32zFUD0