नवी दिल्लीः रिलायन्स आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमतीचे अनेक प्लान ऑफर करते. अनेक ग्राहकांना जास्त डेटा असलेले प्लान हवे असतात. काही ग्राहकांना मोठी वैधता असलेले प्लान हवे असतात. या ठिकाणी आम्ही तुम्हाला ४०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लानसंबंधी माहिती देत आहोत. ज्यात ८४ जीबीचा डेटा मिळतो. या दोन प्लानपैकी एका प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटाचा आहे. तर दुसरा प्लान हा दुप्पट वैधता असलेला प्ला आहे. वाचाः रिलायन्स जिओचा ३९९ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओच्या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा चा प्रीपेड प्लान आहे. ३९९ रुपयांच्या या प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता आहे. या प्रमाणे ग्राहकांना एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. युजर्संना जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी २०० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः रिलायन्स जिओचा ३४९ रुपयांचा प्लान जिओच्या ३४९ रुपयांच्या प्लानमध्ये केवळ २८ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा दिला जातो. या प्रमाणे युजर्संना ८४ जीबी डेटा दिला जातो. यात युजर्संना जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी १ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः कोणता प्लान बेस्ट जर तुम्ही इंटरनेटचा जास्त वापर करीत असाल तर तुमच्यासाठी ३४९ रुपयांचा प्लान बेस्ट आहे. कारण, या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा दिला जातो. जर तुम्हाला डेटासोबत वैधता जास्त हवी असल्यास तुमच्यासाठी ३९९ रुपयांचा प्लान बेस्ट आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iiVeKL