मुंबईः बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यू प्रकरणात अनेक घडामोडी होत आहेत. ८ जून रोजी सुशांतची गर्लफ्रेंड ही त्याच्या घरातून निघून गेली होती. सुशांतनंच रियाला घरातून निघून जाण्यासाठी सांगितल्याचं तिनं पोलिसा जबाबात म्हटलं आहे. रियानं जेव्हा सुशांतचं घर सोडलं,त्यानंतर तिनं बॉलिवूड दिग्दर्शक यांना मेसेज करून यासंदर्भात सांगितलं होतं. रिया आणि महेश भट्ट यांचं हे चॅट व्हायरल झाल्यानंतर सुशांतचे चाहते संतापले असून सोशल मीडियावर दोघांना प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. काय आहे हे चॅट? सुशांतचं सोडल्यानंतर रियानं महेश भट्ट यांना मेसेज पाठवला होता. 'आयशा आता पुढं गेली आहे सर, मनापासून आणि शांततेत. तुमच्यासोबत झालेल्या शेवटच्या संभाषणानं माझे डोळे उघडले. तुम्ही माझे एंजेल आहात. तुम्ही तेव्हाही होते आणि अजूनही आहात', असं रियानं मेसेजमध्ये म्हटलं आहे. तर रियाच्या या मेसेजला महेश भट्ट यांनी दिलेलं उत्तर धक्कादायक असंच आहे. आता मागं वळून पाहू नको. आपल्या वडिलांना माझे प्रेम सांग. आता ते खूप आनंदी होतील, असं त्यांनी रियाला मेसेज करून म्हटलं आहे . आता या मेसेजमध्ये महेश भट्ट यांनी रियाच्या वडिलांचा उल्लेख केला आहे. यावरून रियाचे वडिल देखील सुशांतसोबतच्या नात्यावरून आनंदी नव्हते असं समोर येत आहे. दरम्यान, या व्हायरल होणाऱ्या चॅटबाबत अद्यापही कुणीही दुजोरा दिलेला नाही. व्हायरल चॅटमध्ये रिया सतत महेश भट्ट यांचं आभार मानताना दिसतेय. भट्ट यांनी आपल्याला खूप मदत केलीय. असं रियानं एका मेसेजमध्ये लिहिलंय. तुम्ही मला पुन्हा मुक्त केलंय. तुम्ही आयुष्यात मला देवासमान आहात, असं रियानं म्हटलं आहे. तर महेश भट्टही रियाला मुलगी समान असल्याचं म्हणत आहेत. इतकं मोठं धाडसं केलं, असं म्हणत भट्ट यांनी रियाचं कौतुक केलं आहे. महेश भट्ट यांचा जबाब सुशांतच्या मृत्यूनंतर महेश भट्ट यांची मुंबई पोलिसांनी चौकशी केली होती. महेश भट्ट यांनीच रियाला सुशांतपासून दूर होण्याचा सल्ला दिल्याचं म्हटलं गेल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. या चौकशीत त्यांनी रियाला असा कोणताही सल्ला दिला नसल्याचं म्हटलं आहे. आता हे चॅट व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्न पुन्हा समोर आले आहेत. रिया सुशांतबद्दल निर्णय घेताला अनेकदा महेश भट्ट यांची मदत का घ्यायची असा प्रश्न चाहते विचारत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YjAT0g