Full Width(True/False)

CBI इन अॅक्शन; ताब्यात घेतले सुशांतचे कपडे, ५६ स्टेटमेन्ट आणि..

मुंबई- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सीबीआयने सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी करत आहेत. मुंबई पोलिसांकडून हँडओव्हर घेतल्यापासूनच या तपासाला सुरुवात केली आहे. सीबीआयचे अधिकारी वांद्रे एसएचओ आणि आयओ यांनाही भेटले. आतापर्यंत नोंदवून घेतलेल्या ५६ जबाबांचा हँडओव्हर मुंबई पोलिसांनी सीबीआयला दिला आहे. पोलिसांनी काय- काय दिलं याशिवाय फॉरेन्सिक रिपोर्ट, घटनेचा पंचनामाचा अहवाल, शवविच्छेदन अहवाल, सुशांतचे तीनही मोबाइल फोन, त्याचा लॅपटॉप, सुशांतने त्या दिवशी घातलेले कपडे, मोबाइलचे सीडीआर विश्लेषण, वांद्रे पोलिसांची केस डायरी, सुशांतच्या खोलीतील ब्लँकेट्स, बेडशीट्स, ज्या कपड्याला लटकलेल्या अवस्थेत सुशांत सापडला तो कपडा, कुर्ता, कप प्लेट ज्यात सुशांतने ज्यूस प्यायलं, सीसीटीव्हीच्या डीव्हीआर सारख्या सर्व गोष्टी मुंबई पोलिसांनी सीबीआयला दिल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजची होईल का मदत? एवढंच नाही तर सीसीटीव्ही डीव्हीआर आणि इमारतीचे कॅमेरे ज्यात १३ आणि १४ जूनचं रेकॉर्डिंग झालं आहे. हे पुरावेही मुंबई पोलिसांनी दिले. तसेच त्या जागेतील फॉरेन्सिक स्पॉटही सीबीआयला देण्यात येणार आहेत. नीरज यांचे विधान महत्वाचे आहे दरम्यान, सध्या सीबीआय सुशांतचा स्वयंपाकी नीरजची चौकशी करत आहे. यासाठी त्याला गेस्टहाउसवर बोलावण्यात आले आहे. सीबीआयने प्रथम नीरजचा जबाब नोंदवून घेतला. सुशांतच्या मृत्यूच्या वेळी स्वयंपाकी नीरजही तिथे उपस्थित होता. असं म्हटलं जातं की, नीरजचा जबाब या संपूर्ण प्रकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सुशांतने त्याच्याकडे ग्लासभर पाणी मागितल्याचं नीरजने प्रसार माध्यमांना सांगितलं होतं. तसंच सुशांत दरवाजा आतून कधीच बंद करायचा नाही असंही नीरज याआधी सांगितलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3j0OJMH