Full Width(True/False)

करोनावर मात केल्यानंतर अभिषेक बच्चन पुन्हा काम करण्यास सज्ज

मुंबई : आजाराशी लढा यशस्वीपणे जिंकल्यानंतर अभिनेता पुन्हा एकदा काम सुरू करण्यास सज्ज आहे. येत्या काळात आपल्या विविध प्रोजेक्ट्सवर तो लक्ष केंद्रीत करणार आहे. तो म्हणाला, की, 'पुन्हा एकदा काम सुरू करण्यासाठी मी नियोजन करतो आहे. 'बिग बुल' आणि 'बॉब बिस्वास' हे चित्रपट अजूनही पूर्ण करायचे आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर आवश्यक त्या परवानग्या मिळवून कामाला सुरुवात करीत आहोत.' कोव्हीडग्रस्त असलेल्यांसाठी किंवा त्याची भीती मनात बसलेल्यांना काय संदेश देशील? असं विचारलं असता अभिषेक म्हणाला, की 'हे सांगण्यासाठी मी कोणीही मोठा नाही. मी वैद्यकीय सल्ला देण्यासही पात्र नाही. व्यक्तिशः मी एवढंच सांगू शकतो की, एक सकारात्मक मानसिकता ठेवा आणि शिस्त पाळून सर्व गोष्टी करा.' दरम्यान, 'ब्रीद: इन टू द शॅडो' या वेब सीरिजमधील अभिषेकच्या कामाचं कौतुक होतंय. अभिषेकनं यात मध्यवर्ती भूमिका साकारली होती. आता पुढे देखील 'बिग बुल' आणि 'लुडो'सह त्याचे आगामी अनेक प्रकल्प ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lvY4OX