Full Width(True/False)

जबरदस्त मेड इन इंडिया अॅप, फोटो क्लिक करुन बनवा पीडीएफ

नवी दिल्लीः ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घातल्यानंतर भारत सरकारने पुन्हा एकदा ४७ अॅप्सवर बंदी घातली आहे. अनेक चायनीज अॅप्सचा वापर भारतातील कोट्यवधी लोक करीत होते. हे अॅप बंद झाल्यानंतर याचा पर्याय सुद्धा अनेक जण शोधत होते. यात प्रसिद्ध अॅप होता. याच्या मदतीने फोनच्या कॅमेऱ्याने स्कॅन करून पीडीएफ फाईल्स तयार केली जावू शकत होती. तसेच डॉक्यूमेंट प्रमाणे शेयर केले जात होते. आता याचे बेस्ट मेड इन इंडिया ऑप्शन आले आहे. वाचाः नवीन PhotoStat अॅप मध्ये अनेक असे फीचर्स आहेत. जे CamScanner मध्ये दिले गेले नव्हते. यात स्कॅन करण्यासाठी सर्वात चांगले मेड इन इंडिया पर्याय मानले जात आहे. या अॅपला संदीप हुडकासियाच्या टिमने तयार केले आहे. हे पूर्णपणे सिक्योर आहे. या अॅपमध्ये कोणतेही वॉटरमार्क डॉक्यूमेंट्स दिसत नाही. हे १०० टक्के फ्री आहे. त्यामुळे याचा वापर करताना या अॅपमध्ये कोणतीही जाहिरात युजर्संना दिसणार नाही. वाचाः हिंदीत वापरता येणार हे अॅप या फीचर्स अॅपमध्ये हिंदी भाषेचा सपोर्ट दिला आहे. तसेच गरज पडल्यास डॉक्यूमेंट्स ला तुम्ही फेवरेट मार्क सुद्धा करू शकता. या अॅपला बेसिक स्टोरेज आणि कॅमेरा परमिशन दिल्यानंतर केवळ कोणत्याही डॉक्यूमेंट्सवर कॅमेरा पॉइंट करावे लागते. त्यानंतर त्याला स्कॅन करुन पीडीएफ फॉरमॅट सेव्ह करून शेयर केले जावू शकते. वाचाः टेक्स्ट रिकग्निशनचा सपोर्ट या अॅपमध्ये OCR (टेक्स्ट रेकग्निशन) फीचरचा सपोर्ट दिला आहे. याच्या मदतीने स्कॅन करण्यात आलेल्या डॉक्यूमेंट्समध्ये लिहिलेले टेक्स्ट मेसेज कॉपी केले जावू शकते. तसेच या अॅपमध्ये डार्क मोड थीमचा सपोर्ट सुद्धा मिळतो. जवळपास ३७ एमबी साईज असलेल्या या अॅपमध्ये स्कॅन करण्यात आलेले डॉक्यूमेंट्सला वेगवेगळ्या फोल्डर्समध्ये अरेंज केले जावू शकते. यात चार कलर फिल्टर्स देण्यात आले आहेत. या अॅपला प्ले स्टोरवर ४.८ हून अधिक रेटिंग्स मिळाली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30EnqS1