Full Width(True/False)

मृत्यूपूर्वी सुशांतनं 'या' शहरांत सर्च केली होती प्रॉपर्टी

मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेता (sushant singh rajput) याच्या निधनानंतर त्याच्या मृत्यूचं कारण समोर येण्यासाठी आता सीबीआयची एक टीम कसून तपास करत आहे. गेल्या दोन महिन्यात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी सुशांतनं आत्महत्याच केली असल्याचं ठामपणे सांगितलं होतं. परंतु सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या झाली असावी, असं त्याच्या चाहत्यांनी आणि कुटुंबियांनी म्हटलं आहे. त्यामुळं याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सीबीआयची टीम तपास करत आहे. सुशांतच्या वडिलांनी सुशांतची गर्लफ्रेंड () हिच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत दाखल झाली होती. यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. पूर्व मॅनेजर दिशा सालियन हिच्या आत्महत्येचा सुशांतला मोठा धक्का बसला होता. तिच्या आत्महत्येसंदर्भात नाव घेतलं जाईल, अशी भीती आतल्या आत त्याला खात होती. तिच्या आत्महत्येनंतर तो आणखी नैराश्यात गेला होता. १४ जूनला आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं गुगलवर स्वत:चं नाव सर्च करत त्याच्याबद्दल काय -काय लिहिण्यात आलं हे वाचलं होतं. त्यानंतर त्यानं '',(वेदनारहित मृत्यू) असंही सर्च केलं होतं. त्यामुळं ही आत्महत्याचं आहे, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं. पण आता आणखी एक खुलासा असा करण्यात आला आहे की, सुशांतचा मृत्यू झाला त्या दरम्यान त्यानं गुगलवर हिमाचल प्रदेश, केरळ आणि कुर्ग इथं प्रॉपर्टी चर्च केली होती. सुशांत बॉलिवूडला राम-राम ठोकून कुर्ग इथं ऑरगॅनिक शेती () करण्याच्या विचारात होता. तो मुंबई सोडून जाणार होता, त्यामुळं तो कुर्ग इथं घर किंवा जमीन खरेदी करण्याच्या तयारीत होता. रिया आणि सुशांतचा सर्वांत जवळचा मित्र महेश शेट्टी यांनं देखील पोलिसांना सुशांतला ऑरगॅनिक शेती करण्याची इच्छा होती,असं सांगितलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2DcBSb1